ईतर

कोपरा बु ग्रामपंचायतीच्या निवासी क्षेत्रात अवैधरीत्या उभारलेला मोबाईल टॉवर हटविण्याची मागणी ; अन्यथा आंदोलन किंवा उपोषण छेडण्याचा स्थानिक रहिवाशांचा इशारा!

संबंधित ग्रामपंचायतींच्या अधिकारी पदाधिकाऱ्याचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

पुसद : तालुक्यातील कोपरा बु ग्रामपंचायतीच्या हद्दीतील  निवासी क्षेत्रात अवैधरित्या उभारण्यात आलेला मोबाईल टॉवर तसेच सगळीकडे मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम ऐकू येत असल्याने या टॉवरमुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांना आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या धास्तीपोटी येथील स्थानिक रहिवाशांनी हा मोबाईल टॉवर तात्काळ हटविण्याची मागणी संबंधित ग्रामपंचायत तसेच तहसील विभागाकडे केली आहे.जर हा मोबाईल टॉवर तात्काळ हटविला नाही तर आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, पुसद तालुक्यातील कोपरा बुद्रुक ग्रामपंचायतीच्या हद्दीत निवासी क्षेत्रात अवैधरित्या उभारण्यात अलेल्या मोबाइल टॉवरला नागरिकांनी विरोध केला आहे. तसेच सगळीकडे मोबाईल टॉवरचे दुष्परिणाम ऐकू येत असल्याने या टॉवरमुळे स्थानिक रहिवाशांना धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही रेडीएशनमुळे वयस्कर लोकांना हृदयविकाराचा त्रास, लहान मुलांच्या मेंदूवर परिणाम, पावसाळ्यात वीज पडण्याची शक्यता असते. तसेच मोबाइल टॉवरपासून आजुबाजुला रहिवासी आसणाऱ्या रहीवाशी नागरिकांना डोकेदुखी, मानसिक विकार, श्रावणशक्ती कमी होणे, मेंदूला सुज येणे झोपे संबंधि समस्या, हृदयराेगाची समस्या, नैराश्य, प्रजनन क्षमतेच्या समस्या उद्भवू शकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याच्या धास्तीपोटी येथील स्थानिक रहिवाशांनी या मोबाईल टॉवर संदर्भात तक्रारकर्त्यांनी भारतीय दुरसंचार नियामक प्राधिकरण, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, माहिती तंत्रज्ञान मंत्री, पालकमंत्री, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर आरोग्यमंत्री उपविभागीय अधिकारी, तर तहसीलदार ग्रामपंचायतीकडे तक्रार देण्यात आली परंतु सबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकाऱ्यांचे व संबंधित पदाधिकाऱ्यांचे त्या मोबाईल टॉवर कंपनीशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे संबंधित ग्रामपंचायत अवैधरीत्या उभारण्यात आलेल्या मोबाईल टॉवर संदर्भात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा तक्रार कर्त्याचा आरोप आहे.त्यामुळे हा मोबाईल टॉवर तात्काळ हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.हा मोबाईल टॉवर तात्काळ न हटविल्यास तक्रारकर्त्यांनी आंदोलन किंवा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.‌

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close