सामाजिक

भारती मैंद पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत वृक्षारोपण अभियान सुरु!

पुसद:भारती मैंद नागरी सहकारी पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रमांतर्गत १ जुलै रोजी वृक्षारोपण व संगोपन अभियान उपक्रमाला सुरुवात झाली. जाजू हॉस्पिटल चौक ते वासवी नगर व अंतर्गत रस्त्यांवर पाम जातीचे ४वर्ष वयाची पूर्ण वाढ झालेले१०० वृक्ष तसेच शहरातील एकूण ३२हनुमान मंदिर परिसरात प्रत्येकी ५ पंचवटी वृक्ष असे एकूण २६० वृक्ष लावून त्यांचे संगोपन केले जाणार आहे. वृक्ष लागवडी नंतर त्यांना नियमित पाणी,आवश्यक ते खत कीटकनाशक देणे तसेच वृक्षाभोवती मजबूत लोखंडी ट्री गार्ड लावण्यात येणार असल्याचे पतसंस्थेच्या सामाजिक उपक्रम समिती चे अध्यक्ष तथा पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद यांनी सांगितले.पतसंस्थेचे अध्यक्ष एड अप्पाराव मैंद यांच्या मार्गदर्शनात व शरद मैंद यांच्या संकल्पनेतून१जुलै रोजी येरावार ले-आऊट परिसरात या उपक्रमाची सुरुवात झाली. यावेळी पतसंस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भारत जाधव, संचालक मंचकराव देशमुख,लक्ष्मीकांत उपलेंचवार,शफीक हिराणी,विलास कोरडे,मधुकर घडयाळे,उदय गंधेवार,अभिजीत पानपट्टे,अजय पुरोहीत,अनिल चव्हाण,संदिप चौधरी,निखील चिद्धरवार,सुर्यकांत तगलपल्लेवार,अरुण वायकोस, एड. विनोद पाटील,गजानन रेवणवार,राजेश डुब्बेवार, किशोर पानपट्टे,समिर गवळी,रंजित सांबरे, सुरज डुब्बेवार,संगमनाथ सोमावार,अभिलाष ढाले, यशवंत चौधरी, गोपाल डवले,संदिप वटटमवार, सुनिल चव्हाण, पांडुरंग चोपडे, कौस्तुभ धुमाळ, आकाश धाडवे,विक्रांत जिल्हेवार , राजेश विश्वकर्मा, जनार्धन ढोले नेहाल वानखेडे, हितेश पांडे, सतिष नाईक,भारत तायडे, योगेश तायडे, प्रकाश धरप,मोहन चव्हाण, किरण तगडपल्लेवार,गजानन पदमवार,किरण देशमुख, सुजय सुर्यतळ,सुर्यकांत पोरजवार, मोहन बोजेवार, अमोल व्हडगिरे,ॲड. शिवाजी खराटे,ॲड. राहुल राठोड, ललीत सेता,शिरीष लोखंडे, निलेश अग्रवाल, शिवाजी ठेंगे, अजय जांगीड,गफ्फारभाई, गजानन नाकाडे, विलास खुडे, अशोक आडे, प्रविण गादेवार, अमोल नाईक. शिवम मारकड, संतोष भोयर, प्रतिक बोपचे अदी मान्यवराची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close