पुसद येथे पाण्यावर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा संपन्न!वरिष्ठ गटातून कु.भाविका पंदीलवार तर,कनिष्ठ गटातून कु.आरती नावडे हिने पटकावला प्रथम क्रमांक!

पुसद :पंचायत समिती येथे जल जीवन मिशन अंतर्गत प्रभावी प्रचार प्रसिध्दीसाठी व विद्यार्थ्यांमध्ये पाणी या घटकावर व्यापक अर्थाने जनजागृती व्हावी यासाठी तालुकास्तरीय महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
ही वक्तृत्व स्पर्धा दि,९जानेवारी २०२४ रोजी पंचायत समितील सभागृहात घेण्यात आली होती.
या स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी टि.डी. चव्हाण तर उद्घाटक श्री भांगे हे उपस्थित होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संतोष डाखोरे, सोनटक्के तसेच महीला महाविद्यालयातील पूरी मॅडम इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.या स्पर्धेसाठी पाऊस पाणी संकलन, पाणी आडवा पाणी जिरवा, जल हेच जीवन, माझ्या गावातील पाणी पुरवठा, पाण्याचे स्रोत बळकटीकरण, जलसंवर्धन, पाण्याचे सुयोग्य वितरण व देखभाल दुरुस्ती हे विषय होते.
वक्तृत्व स्पर्धा कनिष्ठ महाविद्यालयीनस्तर वरिष्ठ महाविद्यालयीन (पदवीधर) विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते.कनिष्ठ महाविद्यालय गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय स्पर्धक व वरिष्ठ महाविद्यालय गटातून प्रथम, द्वितीय, तृतीय स्पर्धकांची निवड करून प्राचार्याच्या पत्रासह विजेत्या स्पर्धकांची नावे तालुकास्तरावरुन कळविण्यात येणार आहे.
तालुकास्तरीय स्पर्धा कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटातील महाविद्यालयस्तरावरून तालुकास्तरावर उपलब्ध स्पर्धकांची वक्तृत्व स्पर्धा घेऊन दोन्ही गटातून प्रत्येकी ३ असे एकूण ६ विजेत्या स्पर्धकाची निवड तालुकास्तरीय समितीमार्फत करण्यात आली असून तालुकास्तरावर निवड झालेल्या कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटातील प्रति तालुका ६ निवडक विजेत्या स्पर्धकांची जिल्हा स्तरावर नियोजित दिवशी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. तर या स्पर्धेकरिता परिक्षक म्हणून प्रा. पखाले,चेतन कांबळे, प्रा.अशोकराव पोले, शिक्षण विस्तार अधिकारी भांगे, टि.डी. चव्हाण हे होते या स्पर्धेकरिता जूनीअर गट या मधून ३१ विद्यार्थी तर सिनीअर गट या मधुन ९ विद्यार्थी उपस्थित होते. वरिष्ठ गटातून तीन तर कनिष्ठ गटातून तीन अशी दोन्ही गटातील स्पर्धकाची निवड करण्यात आली. त्यामध्ये वरिष्ठ गटातून कु.भाविका पंदीलवार तर, कनिष्ठ गटातून कु.आरती नावडे हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर उर्वरित वरिष्ट गट कु. व्दितीय क्रमांक कु. पल्लवी प्रकाश पौळ, वत्सलाबाई नाईक महाविद्यालय, तृतीय क्रमांक स्वप्नील शंकरराव माहूरे. गुलाब नबी समाजकार्य महाविद्यालय, कनिष्ठ गट,व्दितीय क्रमांक निकीता पंडीत शिंदे कोषटवार दौलतखान महाविदयाल,सानिका देशमुख, वसंतराव पूरके कनिष्ठ विद्यालय पुसद,या विद्यार्थिनी अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा क्रमांक पटकावला आहे.तालुकास्तरावर निवड झालेल्या या कनिष्ठ व वरिष्ठ या दोन्ही गटातील ६ निवडक विजेत्या स्पर्धकांची जिल्हा स्तरावर नियोजित दिवशी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर १६ तालुक्यातील विजेते स्पर्धक सहभागी होणार असून या स्पर्धकांमध्ये ही स्पर्धा होणार आहे त्यामध्ये स्पर्धेत सहभागी जिल्हा स्तरावर तज्ञ समितीमार्फत परिक्षण करुन अंतिम निर्णय घेण्यात येईल. विजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे २१ हजार, ११ हजार व ५ हजार ५०० रुपये अशी बक्षिसांची रक्कम व प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन जिल्हास्तरावर गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार (एसबीएम) कृती समूहाचे समन्वयक रामेश्वर जाधव यानी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीते साठी सुमित कनोजे,विजय इंगळे,कविता चौधरी विवेक भालेराव अदींनी परिश्रम घेतले .



