क्राइम

युवकाने घळफास घेऊन केली आत्महत्या ; आत्म्हेतेचे कारण अस्पष्ट

पुसद शहर पोलिस स्टेशनच्या हद्दीतील घटना!

पुसद :शहरातील माळीपूरा येथील रहिवासी असलेल्या युवकाने घराच्या छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात सर्वत्र हळ हळ व्यक्त होत आहे.सदर तरुण हा सर्वत्र परिचित असून शेती करत असल्याचे संबंधिता कडून बोलल्या जात आहे. सविस्तर असे की आज दि. १२ ऑगस्ट च्या दुपारी जेवणानंतर पंकज कुंदन मडके वय वर्ष ३६ यांनी दुपारी एक ते दीडच्या दरम्यान स्वतःच्या घरात छताच्या लाकडी बल्लीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली आहे. सदर युवकाला एक मुलगी असून आई-वडील,भाऊ, आणि बहीण असा आप्त परिवार आहे. वृत्तलेहीपर्यंत आत्महत्याचे कारण स्पष्ट झाले नाही. परंतु मागील ८ महिन्यांपासून मृतक युवक आपली पत्नी पासून विभक्त राहत होता या पारिवारिक कारणातून त्याने आपली जीवन यात्री संपवली असल्याची चर्चा सुरू असून पुढील तपास शहर पोलीस स्टेशन करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close