राजकिय

‘सुदृढ लोकशाही’ निकोप निवडणुक पार पडण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत गुन्‍हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या उमेदवारांना मतदान करू नका!-ॲड. ज्ञानेद्र कुशवाह यांचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनआव्हान!

पुसद : नगर परिषदेच्या निवडणुकीत लोकशाही मजबूत करण्यासाठी गुन्हेगारी मुक्त व भयमुक्त प्रशासन ‘सुदृढ लोकशाही’ निकोप निवडणुका’ या पार पडण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना किंवा कोणत्याही व्यक्तींना तिकीट देऊ नाही किंवा मतदारांनी मतदान करू नये असे आव्हान ॲड. ज्ञानेद्र कुशवाह राष्ट्रीय सहसंयोजक लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान भारत यांच्यावतीने हॉटेल दीप संध्या येथे झालेल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

 आज सकाळी ९:३० वाजण्याच्या सुमारास हॉटेल दीपसंध्या येथे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोकतांत्रिक राष्ट्रनिर्माण अभियान मार्फत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लोकशाही व्यवस्था सक्षम करण्यासाठी व व राजेशाही व्यवस्था निर्माण करणाऱ्याना पराभूत करण्याचा संकल्प करून लोकशाही मुल्यांचे संवर्धन करून गुन्हेगारी मुक्त भ्रष्टाचार मुक्त नगरपरिषद आणि नागरिकांच्या स्वास्थ्याचा संकल्प सादर करण्यात आला. त्यामध्ये सर्व राजकीय पक्षांना तसेच मतदारांना आवाहन करण्यात आले.१)गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या उमेदवारांना मतदान करू नका.२)राजकीय पक्षांनी गुन्हेगारी उमेदवार, हिंसाचारी, बलात्कारी, भू माफिया, भ्रष्टाचारी व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना उमेदवारी देऊ नये३)जर राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्णभूमीच्या व्यक्तींना उमेदवारी दिल्यास किंवा उमेदवार असल्यास अशा उमेदवारांना पराभूत करण्याचा संकल्प करावा आणि गुन्हेगारांवर आश्रित असणाऱ्यांना पराभूत करा. ४)भारतीय संविधानाने सर्व व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला. त्या अमूल्य मतदानाचा उपयोग चरित्र्यसंपन्न, सुशिक्षित व विकासाभिमुख उमेदवारांना मतदान करण्यात यावे.५) भारतीय संविधानाने मतदानाचा अधिकार दिला आहे. त्यामुळे रूपये घेवून मतदान करणे हे भारतीय संविधान विरोधी कृती आणि व्यवहार आहे.६)सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय नेतृत्वांच्या जातींकडे न बघता पात्र असलेल्या उमेदवारास मतदान करावे ७)लोकशाहीव्यवस्था सक्षम करण्याकरिता राजेशाही व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पराभूत करण्याचा संकल्प करणे म्हणजेच लोकशाही मूल्यांचे संवर्धन आहे.८) कोणत्याही आर्थिक अमिषाला बळी न पडता मतदान करून पवित्र कार्य करावे.९)भारतीय लोकशाही आई.सी.यू. मध्ये जात आहे. याकरिता सुजान व विवेकशील उमेदवारांना मतदान करून लोकशाही वाचविण्याचा किमान प्रयत्न करावा. असे आव्हान पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ॲड. ज्ञानेद्र कुशवाह राष्ट्रीय सहसंयोजक लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान भारत, यांच्यासह त्यांच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी या पत्रकार परिषदेला लोकतांत्रिक राष्ट्र निर्माण अभियान, भारतचे ॲड. ज्ञानेन्द्र कुशवाह राष्ट्रीय सहसंयोजक, पदाधिकारी गोविंद चव्हाण (यवतमाळ), डॉ. कल्याण साखरकर, राजकुमार दिघडे, यशवंत देशमुख, ॲड.यासिर अहमद खान, शारदा वायकुळे, शैलाताई सावंत, प्रा. प्रतिभा कुशवाहा, प्रा. नंदकुमार खैरे, अतुल श्रीवास्तव, ॲड. यादव जांभुळकर, सुरेश कापसे, विकास मनोहर, अमोल गांगात्रे, ॲड योगेंद्र पाठक, शकीला शेख अब्दुल रहीम (पुसद) तसेच विविध प्रसार माध्यमाचे वार्ताहार प्रतिनिधी हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close