फुटबॉलच्या मैदानावर हजरत उमर फारूकचा जलवा; तालुकास्तरीय विजेतेपदावर मोहोर!

पुसद : तालुकास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत हजरत उमर फारूक माध्यमिक शाळा, पुसद येथील फुटबॉल संघाने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तालुकास्तरीय विजेतेपद पटकावले.अंतिम सामन्यात शाळेच्या संघाने शानदार सांघिक खेळाचे प्रदर्शन करत जेटकिड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संघाचा २-० गोलने पराभव केला. संपूर्ण स्पर्धेत खेळाडूंनी उत्कृष्ट आक्रमण, भक्कम बचाव आणि उत्तम सांघिक समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी केली. अंतिम सामन्यातही खेळाडूंनी आत्मविश्वासाने खेळ करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संघाकडून सय्यद उजैर आणि मिर्झा तिहामी यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
या शानदार विजयामुळे हजरत उमर फारूक शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संघाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मुख्याध्यापक मो. वकील सर (माध्यमिक), याहीया खान सर (प्राथमिक), सर्व शिक्षकवृंद, शाळा व्यवस्थापन तसेच पालकांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.या यशामागे खेळाडूंची मेहनत, नियमित सराव आणि शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वपूर्ण ठरले. या मार्गदर्शनात नदीम खान सर व मो. फैसल सर यांचा मोलाचा वाटा आहे.हजरत उमर फारूक शाळेच्या फुटबॉल संघाच्या या शानदार विजयाचे सर्वत्र कौतुक होत असून, शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाची परंपरा आणखी बळकट झाली आहे.



