वसंत. बी कुलकर्णी गडचिरोलीचे प्रधान जिल्हा न्यायाधीश

गडचिरोली: जिल्हा व सत्र न्यायालयाचे विद्यमान प्रधान न्यायाधीश व्ही. एस कुलकर्णी हे येत्या दिवसात सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागेवर यवतमाळ जिल्हा न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश-१ वसंत.बी कुलकर्णी यांना नियुक्ती देण्यात आली आहे. कुलकर्णी हे वरिष्ठ अतिरिक्त सत्र न्यायाधीश होते व बरेच महिन्यापासून प्रमुख न्यायाधीश पदासाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती व दिनांक २३ ऑक्टोबर ला मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती यांनी कुलकर्णी यांचे नावावर आखेर शिक्कामोर्तब केला. यासंदर्भात गुरुवारी अधिसूचना जारी करण्यात आली. वसंत कुलकर्णी हे १९९५ बॅच चे न्यायिक अधिकारी आहे व ते प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी म्हणून लागले. त्यांनी भंडारा, रामटेक, सोलापूर येथे सेवा दिली व २०१३ साली अतिरिक्त सत्र न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी त्यांनी पुसद, नागपूर येथे जिल्हा न्यायाधीश-१ म्हणून कार्य केले आहे. नागपूर येथे असताना संतोष आंबेकर, राजीत सफेलकर अश्या कुख्यात गुन्हेगारांच्या केसेस चालवल्या आहे. तसेच त्यांनी नागपूर येथे प्रबंधक महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण व औद्योगिक न्यायालयाचे सदस्य हे पद सांभाळले आहे. २०१६ पासून ते एन आय ए व मकोका कायद्यांतर्गत विशेष न्यायाधीश म्हणून नेमण्यात आले होते. ते गडचिरोलीत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश म्हणून येणार असल्यामुळे विधी वर्तुळात आनंद व्यक्त केला जात आहे.



