प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी(बन)यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या एक्केचाळीसाव्या दीक्षांत समारंभात Doctor of Philosophy (आचार्य पदवी) प्रदान

अमरावती प्रतिनिधी: येथे दि.२३ फेब्रुवारी रोजी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा एक्केचाळीसावा दीक्षांत समारंभ पार पडला.या दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती मा.श्री.सी.पी. राधाकृष्णन हे होते.प्रमुख अतिथी म्हणून भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री.भूषणजी गवई, राज्यपालाचे सचिव(IAS)श्री.प्रशांत नारनवरे, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.मिलिंद बारहाते,प्र-कुलगुरू डॉ.महेंद्र ढोरे,कुलसचिव डॉ.अविनाश असनारे,परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक डॉ.नितीन कोळी यांच्यासह अधिष्ठाता, व्यस्थानपन परिषदेचे सदस्य यांच्या उपस्थितीत मानव विज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमुटे यांच्या हस्ते फुलसिंग नाईक महाविद्यालय पुसद येथे पदव्युत्तर समाजशास्त्र विभागात कार्यरत तथा श्रीमंती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालय पुसद प्र.समाजशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख व लघु उद्योग भारती.पुसद एमआयडीसीच्या महिला अध्यक्ष प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) यांना DOCTOR OF PHILOSOPHY (आचार्य पदवी) प्रदान झाल्याबद्दल जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री जयभाऊ नाईक ,सचिव. मनोहर भाऊ नाईक , महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत



