Uncategorized

माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन च्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार दिनानिमित्त विशेष अतिथी तहसीलदार सौ. रेखाताई मोहिते मॅडम यांचे हस्ते पत्रकारांचा गुणगौरव!

पुसद : येथील नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असलेली माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या वतीने आपल्या परिसरातील घडलेली प्रत्येक घटना आपल्याला टिव्ही,वृत्तपत्रातून यूट्यूब चैनल मार्फत प्रत्येक तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी अहोरात्र मेहनत करून ती माहिती तूमच्यापर्यंत पोहोचवत असलेल्या व लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून काम करत असणाऱ्या पत्रकार बांधवाचा व ‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे मराठी वृत्तपत्राचे जनक आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त ६ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त पुसद येथील गाडगेबाबा स्मृतीस्थळ पार्डी रोड निंबी येथे पुसद शहरातील ८४ पत्रकारांचा गुणगौरव करून सत्कार व सन्मान करण्यात आला. पत्रकार समाजाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ समाजसेवक दत्तात्रय बापूरावजी जाधव, पंकज पाल महाराज, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जगताप, पुसद तहसीलचे नवनियुक्त तहसीलदार स. रेखाताई मोहिते, शेख मकसूद यांची उपस्थिती होती.

यावेळी सर्वप्रथम या कार्यक्रमाची सुरुवात करताना नुकतेच कर्करोगाच्या आजारानेे निधन पावलेले पत्रकार स्व. दिनेश देविदास खांडेकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारांच्या निःस्वार्थकार्याचे कौतुक करत समाज घडविण्यात पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमानंतर उपस्थित पत्रकार बांधव व मान्यवरांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामुळे कार्यक्रमाला अधिक आपुलकीचे स्वरूप प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी केले.तर आभार गजानन जाधव यांनी मानले या कार्यक्रमास पत्रकार बांधवांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close