ईतर

पुसद-वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटात चार चाकी झाडावर आदळून भिषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी!

पुसद : वाशिम मार्गावरील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सतरमाळ घाटात टॉयोटा चार चाकी वाहनाचा झाडावर आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात जवळपास दोघाजणांचा जागिचा मृत्यू झाला आहे. तर, साहजण गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पुसद वाशिम मार्गावरील सत्तर माळ घाटात नगर येथून टॉयोटा चार चाकी वाहनाने आठ प्रवासी प्रवास करत होते ते वाशिम मार्गे पुसद कडे येत असताना चालकाला अचानक झोप लागल्याने हे चार चाकी वाहन सागाच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला आहे या वाहनात जवळपास आठ जण असल्याची माहिती असून यापैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला असून आहे तर साहजण गंभीर जखमी असल्याची प्रथम दर्शनी माहिती आहे हा अपघात इतका भीषण होता की या वाहनाचा चकनाचूर झाला. हा अपघात होऊन जवळपास दीड दोन तास अपघातग्रस्तांना मदत न मिळाल्याने हे अपघात ग्रस्त तडफडत होते त्यावेळी स्थानिकांनी घटनेची माहिती कळताच घटनास्थळी धाव घेतली त्यावेळी घटनास्थळी खंडाळा पोलीस दाखल झाले असून अपघातग्रस्तांना उपजिल्हा शासकीय रुग्णालय  येथे दाखल करण्यात आले आहे. अशी माहिती प्रथमदर्शी सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close