क्राइम

पोफळी पोलिसांच्या आशीर्वादाने पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध ‘मटका’ हरजित जुगार जोमात;जिल्हा पोलीस अधीक्षक लक्ष देणार का.?

राजरोसपणे खेळला जातो लाखोंचा जुगार; तरीही पोलीस गप्प का.?

पुसद : पोफाळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांच्या आशीर्वादाने अवैध मटका हरजित जुगार देशी दारू चा व्यावसाय जोमात सुरु असून हरजित जुगाराच्या अवैध मटक्याच्या अधीन गेलेल्या तरुणांचे संसार कोमात गेल्याचे विदारक चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. पोलिसांच्या छत्रछायेखाली हर्षी येथील महादेव देवस्थान व मोरोती मंदिराच्या जवळच अवैध व्यावसायाने जोर धरला असून हरजित जुगार खुल्लेआम सुरु आहे. पोलिसांबरोबर अवैध व्यावसायिकांचे जाळे किती घट्ट जुळलेले आहे याचा प्रत्यय येथे येतो या अवैध व्यावसायातून दररोज लाखो रुपयांची उलाढाल येथे होत आहे.पोलिस मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून स्वतःचे कर्तव्य खुंटीला टांगत आसल्याचे विदारक स्थिती आहे.पोफळी पोलिसांकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने तसेच स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पोलिसांनीही धृतराष्ट्राचे सोंग घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

या पोफळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गावात गावात मजुरांची संख्या जास्त आहे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या मोठ्याप्रमाणात आहे. अधिच यावर्षी शेतकऱ्यावर अस्मानी संकट कोसळल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर अधिच मजुराच्या हाताला कामधंदा नसल्याने नागरिक हैरान झाले आहे.त्यातच तरुणांचीच संख्या जास्त आहे. तरुणाईमध्ये वाढत असलेल्या कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेक तरूणांचा कल वाढला आहे. त्याचाच फायदा घेत या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे़. अशा धंद्याकडे तरूणां वाढलेला कल आणि पोलिस विभागाकडून त्याकडे करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. परिसरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांना पोलिसांनी ‘एनओसी’च दिली की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये उपस्थित केल्या जात आहे. मात्र बहुतेक तरुण झटपट पैसे कमावण्याच्या नादात या खेळाच्या अधीन गेले असल्याने अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. तर काहींचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. अनेक तरुण हारजीतीच्या तणावाने व इतरही व्यसनाच्या आहारी गेले आहेत.

हरजितचा खेळ चालविणारा पोलिसांच्या आशीर्वादाने व्यवसाय मिळाला असला तरी या व्यवसायाच्या नादी लागलेले इतर मात्र बरबाद झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. मटक्याच्या व हरजित जुगाराच्या व्यसना अधीन गेलेल्या तरुणांच्या घरातील सदस्य मात्र चिंताग्रस्त आहे. मटका हरजित या जुगारामुळे अल्पवयीन मुलांना दारूचे मोठ्याप्रमाणात व्यसन जडले आहे. ऐन शिकण्याच्या वयात काही मुले देशी दारुचे मटका हरजित जुगाराच्या नादी लागल्याने अनेकांचे भवितव्य अंधातरी झाल्याचे जाणवते. मटका जुगाराच्या हारजीतीमुळे अनेक तरुणांना दारुचे व्यसन जडले असल्याने घरातील दररोज होत असलेल्या वादावादीमुळे संसार उद्ध्वस्त होताना दिसत आहे.गौळ व पुसद येथील जुगार चालक ‘मनोज’ व त्याचे साथीदार मनमौजी करून अवैधधंदे करणारे हे व्यावसायीक प्रसिद्ध आहे. त्यांनी जाणीवपूर्वक या भागातील देवस्थानच्या परिसरात जागोजागी फंटर उभे करून जुगार सुरू करून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कृपाआशीर्वादाने हे हरजित जुगार मोठ्या जोमात सुरू ठेवला आहे.

जर या धंद्याविरुद्ध कुण्या सर्वसामान्य माणसाने आवाज उठवलाच तर, आमची कुणी वाकडे करू शकत नाही असा दमच हे अवैध धंदेवाले देतात कारण ज्यांच्या जोरावर सर्व अवैध धंदे सुरू आहे. त्यांचा आशीर्वाद असल्यामुळे आपले कुणी वाकडे करू शकणार नाही असा या अवैधंद्यावाल्यांचा होरा दिसून येतो मात्र कुणाच्या आशीर्वादाने हे अवैध धंदे चालतात हे सांगण्यास कुण्या ज्योतिषाची गरज पडणार नाही. ज्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची धुरा आहे त्यांचेच कृपाशीर्वाद या जुगार भरवणाऱ्या ‘मौनमोजावर’आहेत.जिल्ह्याला एक कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक वरिष्ठ अधिकारी कुमार चिंता साहेब मिळाले आहेत गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याची त्यांची प्रमाणिक इच्छाशक्ती असली तरी स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी किंवा स्थानिक गुन्हे शाखेचे काही पोलिस कर्मचारी या अवैध धंदेवाल्यांशी आर्थिक संबंध करुन आपल्या तुंबड्या भरत आहेत या अवैध धंदेवाल्यांना पोषक वातावरण निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्याचे व हप्ते खाऊ पोलिसांचे सी डी आर तपासण्याची गरज आहे.जर या पोफळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेला हा जुगार बंद करण्याचे धाडस वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखवीतील काय ? हा प्रश्न नागरिक विचारत आहे. याकडे जिल्हा पोलीस अधीक्षक याकडे लक्ष देतील का?एकीकडे स्थानिक गुन्हे शाखेच्या यवतमाळ पोलीसांचही या जुगाराचा खेळ मांडणाऱ्यावर वरदहस्त असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या अवैध धंद्याच्या हरजित जुगाराचे मॅनेजमेंट पोफळी पोलीस करीत असल्यामुळे स्थानिक गुन्हे शाखा पथकांनी धृतराष्ट्राचे सोंग घेतल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी सदर हप्तेखाऊ पोफळी पोलीसाचा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसचा बंदोबस्त करण्यासाठी बहुतांश अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची एकादा झाडाझडती घेतली आणि यांचे भ्रमणध्वनी तपासुन सिडीआर काढले तर संपूर्ण अवैध धंदेवाल्यचे कॉल संपर्क नंबर आढळून येतील. व संबंधित क्रफ्ट पोलीस कर्मचाऱ्यांची दैनंदिन संभाषण सुद्धा आढळून येतील आणि ‘दूध का दूध, पानी का पानी’ समोर येईल…अशा भ्रष्ट पोलिसांना उघडे पाडून पोलिसांची शान राखावी अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close