खंडाळा येथे महाराजस्व समाधान शिबिराला माळ पठारावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पुसद :तालुक्यातील माळ पठारावरील खंडाळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला माळ पठारावरील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या महाराजस्व समाधान शिबिराला पुसदचे उपविभागीय अधिकारी आशिष बिजवाल, तहसीलदार महादेव जोरवर, यांच्या मार्गदर्शन लाभले होते.नायब तहसीलदार वैभव खाडे यांनी उपस्थित नागरिकांचे ई-पिकपाणी पाहणी मार्गदर्शन केरुन शेतकरी स्तरावर शंभर टक्के पुर्ण करण्याचे आवाहन केले कृषी अधिकारी यांनी पीक नियोजनाबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. या शिबिरात माळ पठारावरील परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या, तक्रारी आणि अर्ज सादर केले.शिबिरात रहिवाशी, उत्पन्न, जात प्रमाणपत्र वाटप, नवीन रेशन कार्डची नोंदणी व वितरण, पीएम किसान योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांशी संबंधित अर्जांची नोंदणी आणि मंजुरी झाली. तसेच जिवंत सातबारा व फेरफार नोंदींचे निकालीकरण, कृषी सल्ला, तसेच विविध कृषी व आरोग्य योजना बाबत मार्गदर्शन देण्यात आले.आरोग्य विभागामार्फत नागरिकांना पाच लाखांपर्यंतच्या उपचारासाठी लाभदायक अशा आरोग्य कार्डांचे वितरण करण्यात आले. शिबिरात आलेल्या प्रत्येक नागरिकाला त्यांच्या समस्यांवर मार्ग मिळावा यासाठी अधिकारीवर्गाने व्यक्तिगत लक्ष देऊन तातडीने कार्यवाही केली. यामुळे शिबिराला आलेल्या लोकांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.अनेक प्रलंबित प्रकरणांना यावेळी मार्ग मिळाला आणि नागरिकांना शासनाच्या विविध योजना चा लाभ मिळवून देण्यात आला. एकूण ६०५ लाभार्थ्यांनी विविध उपक्रमांचा प्रत्यक्ष फायदा घेतला.कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी खंडाळा मंडळ अधिकारी श्रीमती. एस.एस. चोपडे ह्या होत्या. कार्यक्रमास माळ पठारावरील खंडाळा मंडळातील विविध गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व स्थानिक लोकप्रतिनिधीची उपस्थित होते. सदर शिबीर यशस्वी करण्यासाठी सर्व ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक व मंडळ अधिकारी श्रीमती.एस.एस चोपडे यांनी मोलाचे परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार श्री.व्ही.एम. रुडे ग्राम महसूल अधिकारी यांनी केले.



