ईतर

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आदिवासी समाजाने अंगीकृत करावे- माधवराव वैद्य

पुसद: येथे भारतीय संविधाना दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी भारतीय आदिवासी पॅंथर संघटनेच्या वतीने शासकीय विश्रामगृहावर सकल आदिवासी बांधव व समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संविधान दिवस साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली २६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्यात आला. संविधानाचे संरक्षण करणे व जनजागृती करण्याच्या उद्देशाने आपल्या पुसद शहरात त्यानिमित्ताने सामाजिक कार्यकर्ते व समाजसेवक, शामराव व्यवहारे,रामकृष्ण चौधरी नारायण कराळे, भगवान डाखोरे,माधवराव वैद्य माजी समाज कल्याण आयुक्त तसेच तालुक्यातील आदिवासी संघटेनेचे सर्व अध्यक्ष व धडाडीचे कार्यकरते उपस्थितीत होते. यामध्ये रंगराव काळे,माजी. शि.अ,गणपत गव्हाळे, आर पी आय तालुकाध्यक्ष लक्ष्मण कांबळे,पांडुरंग व्यवहारे, मारोती भस्मे, राजेश ढगे,लक्ष्मण टारफे, संदीप व्यवहारे व आदिवासी सरपंच यांचा सत्कार घेण्यात आला. सत्कार्याला वाव मिळावा त्यादृष्टीने संविधान दिनाचे औचित्य साधून सत्कार समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता.हा कार्यक्रम भारतीय आदिवासी पँथर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्याअध्यक्षस्थानी संभाजी सरकुंडे माजी सनदी अधिकारी माजी आयुक्त (आयएएस) यांची उपस्थितीती लाभली.यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीलाच २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या व समाजातील बेलोरा येथील धनवे व काळी दौ. येथील वैद्य यांच्या दुःखद निधनाप्रती भावपुर्ण श्रद्धांजली अर्पित केली देविदासजी डाखोरे (भा.आदि.पँथर संघटना जिल्हाध्यक्ष यवतमाळ) तसेच हरिदास बोके जिल्हाउपाध्यक्ष, रंगराव व्यवहारे जिल्हा सचिव, सुरेश धनवे सल्लगार(महा.), ऍड.संदिप कोठुळे,चिरमाडे, राघोजी कुरकुटे, सुदाम चिरंगे यांच्या मार्गदर्शनात पार पडला. कार्यकरमाचे संचलन उमाटे तर आभार ऍड. कोठुळे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close