दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती व्याख्यान पुष्प;श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद च्या वतीने आयोजन!

पुसद :श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद व विदर्भ साहित्य संघ शाखा पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त व्याख्यानपुष्पाचे आयोजन सोमवार दि.३० नोव्हेंबर २०२६ला सायंकाळी ६.३० वाजता श्री शिवाजी विद्यालयाच्या देवराव पाटील चोंढीकर सभागृहात करण्यात आले आहे . *छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक समन्वय या विषयावर प्रसिद्ध व्याख्याते, व्यासंगी वक्ते तथा इतिहासाचे गाढे अभ्यासक यवतमाळ येथील श्री प्रवीण विनायकराव देशमुख हे व्याख्यान पुष्प गुंफणार आहेत. अविरत चालणाऱ्या व्याख्यान पुष्पाचे हे ३९ वे वर्ष आहे.पुसद शहर व परिसरातील रसिक श्रोते बंधू भगिनी यांनी या आत्यंतिक जिव्हाळ्याच्या विषयावरील अभ्यासपूर्ण व सुश्राव्य अशा व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर, विदर्भ साहित्य संघ पुसद चे अध्यक्ष डॉ. गणेश पाटील, कार्याध्यक्ष दीपक आसेगावकर, सचिव सुधाकर ठाकरे, कोषाध्यक्ष प्रा. गोविंद फुके यांनी केले आहे.



