अमरावती शिक्षक मतदार संघ निवडणुकीत पाठिंब्यावरून राजकारण तापलं! निवडणुकीत उभे असलेल्या उमेदवार उपेंद्र पाटलांनी कोणतीही पूर्व सूचनां न घेता पाठिंब्याचे हँडबिलवर फोटो छापल्याने अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी निवडणूक अधिकाऱ्याकडे केली तक्रार दाखल!

पुसद: होवू घातलेल्या अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या२०२६ निवडणुकीत उभे असलेले उपेंद्र बाबाराव पाटी या उमेदवाराने पुसद येथील शिवाजी शिक्षण संस्थेचे सर्वेसर्वा माजी आमदार विजय अण्णा पाटील (चोंढीकर ) व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्षाचे यवतमाळ उपजिल्हाध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांचा२०२६ या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर पाठिंबा असल्याचे प्रचाराच्या हँडबील व पोस्टरवर कोणतीही पूर्व संमती न घेता पाठिंबा असल्याचे फोटो छापल्याने सदर उमेदवाराच्या या कृतीमुळे या मतदारसंघातील जनतेमध्ये गैरसमज निर्माण करण्याच्या हेतूने परस्पर बदनामी करण्याच्या दृष्टीने तसेच मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने पाठिंबाचे फोटो छापल्यामुळे सदर उमेदवाराचे चोंढीकर कुटुंबाचा कुठलाही दुराणावे संबंध नाही व या उमेदवारास पाठिंबा नाही तसेच गेली दहा-बारा वर्षांपासून अनिरुद्ध पाटील चोंढीकर हे मागील भारतीय जनता पक्षाचे सक्रिय
कार्यकर्ते असल्याने त्यांनी महायुतीच्या उमेदवारास त्यांचा पाठिंबा असल्याचे त्यांनी खुलासा केला आहे सदर उमेदवाराशी माझा व माझ्या वडिलांचा दुरान्वये कोणताही संबंध नसल्याने अशा अफवांना मतदारांनी बळी पडू नये आणि महायुतीच्या उमेदवारास मतदारांनी आपले अमूल्य भरघोस मते देऊन विजयी करावे असे आव्हान केले असून अनिरुद्ध पाटील चोंढीकर यांनी कार्यकारी दंडाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार सुद्धा दाखल केल्याचा खुलासा जाहीर केला आहे.



