Games

वालतूर तांबडे शाळेच्या विद्यार्थिनींची जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी!

पुसद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, यवतमाळ व जिल्हा क्रीडा परिषद, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ५ सप्टेंबर २०२६ रोजी नेहरू स्टेडियम, यवतमाळ येथे जिल्हास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा पार पडल्या.

या स्पर्धेत अंडर-१४ मुलींच्या वयोगटात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा, वालतूर तांबडे येथील विद्यार्थिनींनी उत्कृष्ट व नेत्रदीपक कामगिरी करत विविध क्रीडा प्रकारांत यश संपादन केले. विशेष म्हणजे उंच उडी, ८० मीटर हर्डल्स, ६०० मीटर धावणे, थाळी फेक तसेच ४ × १०० मीटर रिले या प्रकारांमध्ये विद्यार्थिनींनी उल्लेखनीय कामगिरी करून विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.या यशाबद्दल शाळेतील सर्व यशस्वी खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत असून, त्यांच्या मेहनतीला शाळेचे मुख्याध्यापक व क्रीडा मार्गदर्शक मधुकर मोरझडे तसेच शिक्षकवृंदाचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे गटशिक्षणाधिकारी धीरज आडे, विस्तार अधिकारी विश्रांती फोपसे,उमेश वाघमारे, अमित बोजेवार, शितलकुमार वानखडे, केंद्रसमन्वयक प्रल्हाद जाधव, शाळेचे शिक्षक विकास वाकडे, जयसिंग चव्हाण, किशोर दांदडे, सागर राऊत, आलासिंग राठोड, बिबीषण राठोड, चंदूसिंग राठोड, नेमीचंद राठोड, राजू पवार, युवराज राठोड, दिलीप जाधव, परमानंद राठोड, सदानंद राठोड, बलदेव राठोड, रविराज राठोड, केवल भिसे, प्रकाश जिरंगे, राहुल जाधव, संतोष तांबारे, गजानन हमाने, चंदल पवार तसेच वालतूर तांबडे येथील सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले.विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. विद्यार्थिनींच्या या यशामुळे वालतूर तांबडे शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close