ईतर

माऊंट लिट्रा झी स्कूल मध्ये आषाढी एकादशी उत्सव साजरा!

पुसद : येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्सव अतिशय आनंदाने साजरा करण्यात आला .आषाढी एकादशी हा सण भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे .विद्यार्थ्यांना या संस्कृतीचे महत्त्व व वारकरी संप्रदायाची शिकवण कळावे हे दूरदृष्टीकोन ठेवून संस्थेचे अध्यक्ष व सर्व संचालक मंडळांच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाची सुरुवात आराध्य दैवत विठ्ठल व रुक्माई यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

त्यानंतर संगीत शिक्षक ओम प्रकाश गवई यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी गीत व गौळण या भक्ती गीताचे गायन केले. काव्या भास्करवार ,नारायणी मोगरे, आरीनी उबाळे ,स्वराली गवई, शिवांश राजे, विराज पाठक, स्मित मुक्कावार, वंशराज देशमुख , अंशिका वानरे, शरण्या चंंदेल , प्रियांशी राठोड, श्रावणी आगलावे, अधीरा असोले,नियती पुरी,अन्वय पोराजवार, वेद मार्कड, जय वानरे, दक्ष जैन, या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.त्यानंतर अमोल भालेराव यांच्या मार्गदर्शनाने ‘माऊली माऊली ‘या गीतावर विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे नृत्य सादर केले.विद्यार्थ्यांची दिंडी शाळा ते आप्पास्वामी मंदिरापर्यंत काढण्यात आली.सदर दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची वेशभूषा परिधान केले.विठ्ठल नामाने व भजन किर्तनाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला . सदर कार्यक्रमाचे प्रभारी अनिल मुनगेलवार व कुणाल राठोड हे होते.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अकॅडमिक डायरेक्टर, मुख्याध्यापक , शाळा समन्वयक ,प्रशासन अधिकारी , सर्व क्रिडा प्रशिक्षक,तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले . सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आरुषी क्षिरसागर तर आभार रोशनी रुडे या विद्यार्थीनींने मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close