ईतर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर;शेख मुख्तार यांच्या नेतृत्वात आयोजन; नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम संपन्न!

पुसद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त नितीन भुतडा यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा, पुसद तालुक्याचे  तालुकाध्यक्ष शेख मुख्तार यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.रक्तदान हे सर्वोच्च समाजसेवेचे कार्य असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक युवकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित रक्तदान करण्याचे आवाहन केले. भारतीय जनता पक्षाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविणारा हा उपक्रम असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. कार्यक्रमास भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, अल्पसंख्याक मोर्चाचे कार्यकर्ते, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close