ईतर

वर्धा येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात फास्ट ट्रॅक कोर्टात देऊन आरोपीला फाशी फाशीची शिक्षा देण्याची मागणी!

वर्धेत झालेल्या निषेध मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांवर दाखल झालेले गुन्हे मागे घ्या. 

पुसद : संबंध देशाला आणि मानवतेला काळिमा फासणारी घटना ज्याने संपूर्ण वर्धा जिल्हा हादरवणारी घटना जिल्ह्यातील मौजा रोठा येथे अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, तसेच या प्रकरणाचा तपास विशेष तपास पथक (SIT) मार्फत करण्यात यावा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, नवी दिल्लीच्या विदर्भ अध्यक्ष चंद्रशेखर मडावी व वर्धा जिल्हाध्यक्ष शरद आडे यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक, वर्धा यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, १५ जुलै २०२६ रोजी घडलेल्या या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणातील तपास निष्पक्ष व जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  परिषदेने या प्रकरणासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करणे, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवणे, पीडित कुटुंबाला आर्थिक मदत व पुनर्वसन देणे, महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबविणे तसेच शाळा व आदिवासी वसतिगृहांमधील सुरक्षा अधिक मजबूत करण्याची मागणीही केली आहे. तसेच वर्धा येथे निषेध मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यांच्यावरील गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे. या मागण्यांवर प्रशासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेऊन पीडित कुटुंबाला न्याय द्यावा, अन्यथा समाजात तीव्र असंतोष निर्माण होण्याची शक्यता असल्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. यावेळी आदिवासी विकास परिषदेचे विभागीय अध्यक्ष माधवराव वैद्य साहेब जिल्हाध्यक्ष ऍड. सुनीलभाऊ ढाले, अर्जुन हगवणे, ता. अध्यक्ष गजानन टारफे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष गारुळे, राजु गायकवाड, गजानन टाले, गणेश भुजाडे, विजय मुकाडे, ओंकार ढाकरे, संदीप आढाव, दत्ता बोलके, रंगराव भडांगे, दत्तप्रसाद वंजारे, श्रीकांत वंजारे, बबलू मळघणे, तातेराव भडगे, विष्णू शिकारे, बालाजी उघडे, विठ्ठल उघडे, जयवंत भुरके, समाधान बळी, लक्ष्मण पान्डे, रंगराव डाखोरे, मिथुन पान्डे , शुभम तडसे, सुरज मोहकर , सचिन काळे, विजय वाळके, राजेश कपाटे, परमेशवर आगोसे , पारेश्वर दळवे, सह मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close