ईतर

पुसद विधानसभा मतदारसंघात आज ‘एसआयआर’ विशेष कॅम्प ; मतदारांना गणना पत्रक भरून देण्याचे आवाहन!

पुसद : विधानसभा मतदारसंघात मतदान यादीच्या सखोल विशेष पुनरिक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. या कॅम्पमध्ये मतदारांनी उपस्थित राहून गणना पत्रक भरून द्यावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, पुसद विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.या विशेष कॅम्पमध्ये सहभागी होताना प्रत्येक मतदाराने आपले मतदार ओळखपत्र, आधार कार्डची प्रत तसेच रंगीत पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावे. मतदान केंद्रावरील मतदान केंद्रस्तरिय अधिकारी (बीएलओ) यांच्याकडून गणना पत्रक प्राप्त करून ते तात्काळ अचूक माहितीने भरून बीएलओ यांच्याकडे जमा करावे.मतदार यादी अद्ययावत व अचूक ठेवण्यासाठी नागरिकांचे सहकार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुसद विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी या विशेष कॅम्पचा लाभ घ्यावा व बीएलओ यांना सहकार्य करून गणना पत्रक वेळेत सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close