राजकिय

पेट्रोल-डिझेल दरवाढ गगनास भिडल्याने महागाई विरोधात पुसद शहरात महाविकास आघाडी आक्रमक!

महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटते का?

पुसद : सध्या महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती रोजच्यारोज वाढत आहेत. इंधनदर वाढीमुळे वाहतूक खर्च वाढला आणि किराणा, भुसार माल, भाजीपाला, दूध या जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असून नियमित वाढत जाणाऱ्या महागाइचा फटका रोजंदारी कामगार, सरकारी नोकरदार, व्यापाऱ्यांनाही बसत आहे. शाळेची फी, शालेय साहित्याचा वाढता खर्च, गॅस, विजेचे वाढते बील, रोज लागणारे पेट्रोल यातील कोणतीही वस्तू कमी करता येत नाही. महागाईच्या संकटाला कसे तोंड द्यायचे असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.२०१४ च्या आधी भारतीय जनता पक्षाला ‘महंगाई डायन’ वाटत होती पण महागाई प्रचंड वाढली असतानाही तीच महागाई आता भाजपाला ‘डार्लिंग’ वाटू लागली आहे का? भाजप सत्तेत येण्यापूर्वी पेट्रोलडिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा घोषणा मोठ्या थाटात करत होते परंतु मागील १२ वर्षापासून सत्तेचे फळे चाखत असताना सुद्धा या केंद्र सरकारच्या काळात पेट्रोल-डिझेल- एलपीजी सिलेंडरच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. मागील ११ दिवसातच पेट्रोल डिझेलच्या किमती ८ रुपये प्रति लिटरने वाढवलेल्या आहेत. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईने पिचलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आणि सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी आहे पेट्रोल – डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी व वाहनधारकांचे आर्थिक कंबरडे मोडले असून केंद्र सरकारने केलेली दरवाढ तात्काळ कमी करावी या मागणीसाठी आज पुसद शहरात महाविकास आघाडीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपावर मेलोडी चॉकलेटाचा नागरिकांना वाटप करून आगळे वेगळे आंदोलन केले.

इंधन दरवाढीवर भाजपा सरकारचा समाचार घेत महाविकास आघाडीतील स्थानिक नेतृत्वाच्या वतीने तीव्र शब्दात निषेध व्यत केला गेला.इराण युद्धाचे नाव पुढे करून केलेली दरवाढ ही दिशाभूल करणारी आहे. सत्तेत येण्यापूर्वी ट्रोल-डिझेल ३५ रुपये लिटरने देऊ अशा मोठ्या थाटात घोषणा करणारे गेल्या १२ वर्षांपासून सत्तेत असून सुद्धा पेट्रोल- डिझेलच्या किमती कमी केल्या नाहीत ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटते का? तर उलट नरेंद्र मोदी सरकारने, पेट्रोलच्या किमती ३८ टक्क्यांनी, तर डिझेलच्या किमती ६२ टक्क्यांनी वाढवल्या आहेत, त्यावेळी तर इराण इस्त्राईलचे युद्ध नव्हते. पेट्रोल डिझेलच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील क्रूड ऑईलच्या दरानुसार ठरतात हे सर्वांनाच माहित आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या कार्यकाळात कच्च्या तेलाचे दर १०० डॉलर्स प्रति बॅरलपर्यंत पोहोचले असतानाही, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ७२ रुपये लिटरच्या वर जाऊ दिल्या नाहीत. महागाईचा भार डॉ. मनमोहनसिंह यांनी जनतेवर पडू दिला नाही. पण मोदी सरकारच्या काळात कच्च्या तेलाचा भाव ५०-५५ डॉलर्स प्रति बॅरलच्या आसपास रेंगाळत होता तेव्हाही पेट्रोल १०० च्या आसपास विकले जात होते. परंतु गेल्या १२ वर्षांत केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर आणि उत्पादन शुल्काच्या माध्यमातून जनतेच्या खिशातून लाखो कोटी रुपयांचा नफा कमावला आहे आणि मागील चार पाच दिवसात केलेल्या ८ रुपयांच्या दरवाढीतून भारत पेट्रोलियम, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन, या कंपन्यांनी काही तासांतच बाजारातून कोट्यावधीची कमाई केली. ही नफेखोरी जनतेच्या खिशावर दरोडा टाकण्यासाठी सुरू केलेली आहे,दरवाढीवर भाजपा नेत्यांची विधाने बेजबाबदारपणाचा कळस गाठत आहेत राज्यात पेट्रोल- डिझेलचा साठा मुबलक आहे असा दावा भाजपा सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. साठा असेल तर शहरातील विविध भागातील पेट्रोल पंपावर रांगा का लागल्या आहेत?, यावरील भाजपा नेत्यांचे उत्तरही अत्यंत हास्यास्पद आहे. पेट्रोल डिझेलचा साठा केल्याने टंचाई निर्माण होत आहे, असे अत्यंत बेजबाबदारपणाचे विधान भाजपाचे नेते करत आहेत. हे विधान जबाबदारी पासून पळ काढणारे व जनतेच्या डोळ्यात धुळफेकणारे आहे. जनता मुर्ख नाही, हे भाजपाच्या नेत्यांनी लक्षात ठेवावेत आणि सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी वाहतूक खर्च वाढल्याने सर्वच वस्तू महाग झाल्या असून सामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. या सरकारने जनतेची सुरु असलेली लूट थांबवावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आली अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आंदोलकांनी हातात फलक घेऊन केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच पट्रोल पम्पवर येणाऱ्या व्यक्तींना मेलोडी चॉकलेट देऊन आगळा वेगळा आंदोलन करण्यात आला.“इंधन दरवाढ कमी करा”, “महागाईला आळा घाला”, “सामान्य जनतेला दिलासा द्या” अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले.आंदोलनचे नेतृत्व महाविकास आघाडीचे नेते शरदभाऊ मैद काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. सचिनभाऊ नाईक,शिवसेनेचे मोहन विशवकर्मा यांनी केले तर प्रमुख उपस्थिती स्वप्नील जयस्वाल श.प.रा.का. काँग्रेसचे म.रा.प्र .अल्पसंख्याक सचिव ईस्त्याक भाई, काँग्रेस शहराध्यक्ष झिया शेख, प्रवीण कदम राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडिया तालुका प्रमुख.( श प) जुनेद शेख सोशल मीडिया शहर अध्यक्ष.राष्ट्रवादी कांग्रेस (श.प). काँग्रेस तालुका अध्यक्ष विलास वाघमारे,सेना प्रमुख रवी पांडे,वैभव सुने,कार्यद्यक्ष ज्ञानदीप कांबळे,विजय बाबर,ऍड. विघ्ने,युवा काँग्रेसचे सुजित मानकामे, नगरसेवक जब्बार लाखे, गाझी ओसामा, फिरोज खान, इर्षद कुरेशी, प्रकाश नेमायते अभिलाष खैरमोडे सह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close