ईतर

नमुना ‘ड’ आखीव पत्रीका मिळण्याचा मार्ग मोकळा;गरीब जनतेच्या लढ्याला यश!-दिपक परीहार!

पुसद: नगर परिषदेच्या हद्दीतील शिवाजी वार्डसह शहरातील ४००० गरीब जनतेच्या जागेच्या नमुना ड, आखीव पत्रिका देण्या संबंधीचा मार्ग आज मोकळा झाला. त्याबाबतचा शासन आदेश न. प. पुसद येथे प्राप्त झाला. हे जनतेच्या लढ्याला आलेले यश आहे. २०२१ पासून या बाबत लढा देण्यात आला होता. आमरण उपोषण, मोर्चा अशा अनेक मार्गाने या करता मोठे आंदोलन उभे केले होते. तसेच २०२५ ला मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र व्यवहार या करता करण्यात आला होता. राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना 15 सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्यावर त्यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यासंबंधी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना लेखी स्वरूपात कळविले होते. याबाबत त्यानंतर जिल्हाधिकारी यवतमाळ यांचीही भेट घेण्यात आली होती. त्यामुळे श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांचेही या ठिकाणी धन्यवाद मानावे लागतील. या निर्णया करता प्रसंगी नगरपालिका अधिकारी व प्रशासनासोबत दोन हात सुद्धा केल्या गेले होते. या सर्व संघर्षाला आज यश मिळाले. याचे श्रेय कोणीही घेवो पण हे काम होणे गरजेचे होते असे मला वाटते. आज जनतेच्या लढ्याला यश आले असे मात्र माझे प्रामाणिक मत आहे. असे विचार भाजपा जिल्ह सरचिटणीस दिपकसिंह परिहार यांनी प्रसिद्धी पत्रकातून मांडले. शिवाजी वॉर्ड व नवलबाबा वॉर्ड मधील घरांचे नमुना ड, आखीव पत्रिका तयार करण्या करता शासनाने आदेश दिल्या नंतर परिहार यांनी आनंद व्यक्त केला. याबाबत बरेच वर्ष या करता आंदोलन केल्याचे समाधान वाटत असल्याचे शेवटी परिहार यांनी प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. करू शकतो या लढ्यामध्ये शहरातील सर्व पत्रकार मंडळींनी वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून मोलाचे सहकार्य केले म्हणजेच या आंदोलनात पत्रकारही सहभागी होते हे दिसून आले. त्याबद्दल पत्रकारांचे आभार प्रसिद्धीपत्रकातून दीपक परिवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close