क्राइम

नागरिकांनो सावधान!पुसद शहरात अस्सल ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरची विक्री; इलेक्ट्रिक च्या दोन दुकानावर शहर पोलिसांची धाड! पाच लाखाच्या वर मुद्देमाल जप्त!

पुसद : शहरातील इलेक्ट्रिक दुकानातून विद्युत उपक्रमासाठी लागणारा वायर खरेदी करतायं तर सावधान विजेची उपकरणे खरेदी करताना तुम्ही जो आयएसआय (ISI) मार्क पाहता, तो खरा नसू शकतो.अलीकडे शहरातील बाजारपेठांमध्ये बनावट आयएसआय (ISI) चिन्ह असलेल्या उत्पादनांचा सुळसुळाट झाला आहे, शहरात उघडकीस आलेल्या बनावट आयएसआय-चिन्हांकित अस्सल ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरच्या मालाचा घबाड उघड झाले आहे.शहरातील दोन इलेक्ट्रिक दुकानावर पोलिसांनी धाड टाकली असुन या दुकानातुन अस्सल पॉलीकॅप कंपनी ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायर माल जप्त करण्यात आला असून दोन दुकानदार विरुद्ध शहर पोलिसांनी नामांकित कंपनीच्या ब्रँड नावाने बनावट विद्युत केबल्स विक्री करीत असल्याच्या आरोपाखाली या विद्युत साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यामुळे विद्युत उपक्रमासाठी असलं कंपनीचा वायर खरेदी केलेल्या ग्रहाकामध्ये खळबळ उडाली आहे.पुसद शहरातील विद्युत साहित्य विकणाऱ्या इलेक्ट्रिक दुकानदाराचे नांवे रामदेव इलेक्ट्रिकलचे मालक रमेश जलपाराम देवासी तसेच महादेव लाईट हाऊस दुकानाचे मालक मंगलराम सुरताजी चौधरी या दोघांजणा विरोधात दि.३१ मार्च २०२६ रोजी पुसद शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आला आहे.याबाबत शहर पोलीसांच्या सूत्राने दिली माहिती अशी की,मुंबई येथील अस्सल ब्रँड पॉलीकॅप वायर कंपनीच्या कार्यालयाचे कर्मचारी नागेश्वरराव कृष्णमूर्ती नंदीगामा यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहरातील रामदेव इलेक्ट्रिक व महादेव लाईट हाऊस या दोन्ही विद्युत साहित्य विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये नामांकित असलेल्या पॉलीकॅप ब्रँड कंपनीच्या नावाखाली हुबेहूब  डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरची विक्री करत असल्याची माहिती नागेश्वरराव यांनी पोलिसांना दिली होती त्या माहितीच्या आधारे शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांच्या निर्देशाप्रमाणे डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार,पोलीस हेडकॉन्स्टेबल मनोज कदम, दिनेश साळुंखे,मंदाकिनी भगत, आकाश बाभुळकर,शुदोध्दन भगत,इंदू पवार यांनी दोन्हीही दुकानात सापळा रचून धाड टाकली असता या धाडीमध्ये या दुकानची झाडाझडती घेतली त्यावेळी अस्सल ब्रँड पॉलीकॅप कंपनीचे डुप्लिकेट आयएसआय चिन्हाचा गैरवापर करून हा इलेक्ट्रिक वायर साठवून विक्री केली जात होती हे बेईमान विद्युत साहित्य विक्रेते स्वतःच्या फायद्यासाठी ग्राहकांचे केवळ आर्थिक नुकसानच करत नाहीत, तर निकृष्ट दर्जाच्या उपकरणांच्या वापरामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकत होता त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बनावट वायरमुळे जीवितहानी आणि मालमत्तेलाही धोका निर्माण होऊ शकला असता वेळीच शहर पोलिसांनी दखल घेतल्याने मोठा अनर्थ टाळला परंतु शहरात अशा किती विद्युत साहित्य विक्री करणाऱ्या दुकानदारांकडे असल ब्रँड कंपनीच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायरची विक्री होत असेल त्यामुळे अशा दुकानदारावर कारवाई करण्याची गरज आहे कारण आयएसआय चिन्हाचा गैरवापर १४ विद्युत उपकरणांच्या बाबतीत अधिक वापर होतो, जसे की विद्युत तारा आणि केबल्स, इलेक्ट्रिक इस्त्री, रेडिएटर्स, स्टोव्ह, स्विचेस आणि इमर्शन वॉटर हीटर. बीआयएस कायद्यानुसार, आयएसआय चिन्हाशिवाय त्यांचे उत्पादन, साठवणूक किंवा विक्री करणे हा गुन्हा आहे. तरी आशा उत्पादनाची काही विद्युत साहित्य विक्री करणारे दुकानदार जाणिवपूर्वक हे बोगस साहित्य खुल्लेआम विक्री करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. परंतु संबंधित दुकानदाराकडे अस्सल ब्रँडच्या नावाखाली डुप्लिकेट इलेक्ट्रिक वायर साठा मिळून आल्याने सदर दुकानांमधून ब्रँड कंपनीने नकली इलेक्ट्रिक वायर वेगवेगळ्या साईजचे हुबेहूब बनावट इलेक्ट्रिक वायर असा एकूण ५ लाख ९ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल स्वतःच्या आर्थिक फायदा करिता विक्रीसाठी ठेवल्याचे आढळून आल्याने हा माल पोलिसांनी जप्त केला आहे.एका नामांकित कंपनीच्या ब्रँड नावाने बनावट विद्युत केबल्स विकल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी दोन दुकानांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आल्याने डुप्लिकेट इलेक्ट्रिक माल विकणाऱ्या दुकानदाराचे धाबे दणाणले आहे.या प्रकरणाचा अधिक तपास शहर पोलिसांकडून केल्या जात आहे.या दुकानांतून ब्रँड कंपनीचा डुप्लिकेट वायरची खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये फसवणुक झाल्याचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close