राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाशिम जिल्हा निरीक्षक पदी शरद मैंद यांची नियुक्ती!

पुसद : मतदार संघाच्या राजकारणात व समाजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे राष्ट्रवादीचे सरचिटणीस शरद मैंद यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वाशिम जिल्हा निरीक्षक पदी पक्षाध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या आदेशाने प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतीच नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे.
शरद मैंद हे मागील विधानसभा निवडणुकीपूर्वी पासून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात दाखल झाले होते व त्यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने पुसद विधानसभेची निवडणूक लढविली होती तेव्हापासून ते पक्षात सक्रिय असुन ते प्रदेश सरचिटणीस म्हणून पदावर कार्यरत आहेत.शरद मैंद हे शरदचंद्र पवार यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित आहेत.त्याना राजकारणाचा व समाजकारणाचा तसेच सहकार क्षेत्राचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी ( शरदचंद्र पवार) पक्ष संघटना अधिक सक्षम, शिस्तबद्ध व प्रभावी करण्याच्या दृष्टीने तसेच जिल्हास्तरावर संघटनात्मक कामकाजाचा सखोल आढावा घेण्यासाठी वाशिम जिल्हा निरिक्षक पदावर नियुक्ती करण्यात आली आहे येत त्यामध्ये प्रामुख्याने खालील नमूद केलेल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागणार आहेत १) जिल्ह्यातील सर्व, तालुका, शहर, ग्रामीण प्रभाग व बुथ पातळीवर पक्षाचा आढावा घेणे. २)जिल्ह्यातील सर्व फ्रंटल व सेलच्या (विभाग) संघटनेच्या पदावरील नियुक्त्यांचा आढावा घेणे. ३) संघटनात्मक मजबूती, कार्यकर्ता सक्रियता व बुथ समित्या कार्यान्वित आहेत का याचा सातत्याने आढावा घेणे. ४) पक्षशिस्त व संघटनेमध्ये एकसंघता ठेवण्यासाठी कार्यरत राहणे.कोणतीही गटबाजी, अनुशासन भंग, पक्षविरोधी वक्तव्य किंवा कृती आढळल्यास त्यावर तात्काळ हस्तक्षेप करून प्रदेश कार्यालयास अहवाल सादर करावा लागणार आहे ५) स्थानिक प्रश्न, जनभावना व राजकीय परिस्थितीचा निष्पक्ष अहवाल वेळोवेळी सादर करावा लागणार आहे ६) प्रदेश कार्यालयाकडून देण्यात येणारे विविध कार्यक्रम आंदोलने याचा आढावा घेऊन त्याबाबत प्रदेश कार्यालयास कळवावा लागेल तसेच ७) निवडणूक पूर्वतयारी, संभाव्य उमेदवारांचे मूल्यमापन, स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन संघटनात्मक रणनिती सुचविणे. ८) मासिक प्रगती अहवाल नियमितपणे प्रदेश कार्यालयास सादर करणे. ९) जिल्हा संघटना व वरिष्ठ नेतृत्व यांच्यात समन्वय साधणे.पक्षसंघटनेचा आपला प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या जबाबदारीचे गांभीर्य लक्षात घेऊन पक्षहितासाठी निर्भीड, शिस्तबद्ध व निष्पक्षपणे कार्य करावे लागणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.पक्षाचे सर्वेसर्वा ‘‘शरदचंद्र पवार यांनी पुन्हा माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून वाशिम जिल्हा निरीक्षक पदावर काम करण्याची संधी दिली आहे. पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासह पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचविण्यासाठी करीन. तसेच पक्षाला बळकट करून वाशिम जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चा विस्तार करणार आहे,जिल्ह्याच्या निरीक्षक पदी निवड केल्याबद्दल पक्ष्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री शरदचंद्र पवार साहेब ,राज्याचे अध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे साहेब खासदार सौ सुप्रिया सुळे ,माजी अध्यक्ष आमदार जयंत पाटील साहेब व आमदार रोहित दादा पवार यांचे आभार व्यक्त करत नवनिर्वाचित वाशिम जिल्हाचे निरीक्षक शरद मैंद यांनी ‘झेप न्यूज’ शी बोलताना सांगितले.



