ईतर

पुसद तालुक्यातील वडसदच्या गावकऱ्यांनी केला शिक्षकाचा सन्मान!

पुसद: जगात गुरु ला अत्यंत मानाचे स्थान आहे .गुरु बनणे भाग्याचे असते, आणि त्या गुरुने सुद्धा निष्ठेने कार्य करणे तेवढेच गरजेचे असते.निष्ठेने कार्य केले तर गुरूला अतिशय महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. याची प्रचिती वडसद तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील कार्य करणारे साहेबराव राठोड या माजी शिक्षकांच्या सत्कार सोहळ्यातून आली. वडसद तांडा शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त गावकर्‍यांच्या वतीने श्री. राठोड यांचा जाहीर सत्कार कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जि. प.सदस्य भोलानाथ कांबळे हे होते तर, उद्घाटक म्हणून श्री. पुसद पं.स.चे गटशिक्षणाधिकारी धीरज आडे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी सुनील गवळी, केंद्रप्रमुख सोनबा ढोकणे, गावच्या सरपंच सुषमा राठोड ,शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर जाधव ,बळीराम जाधव , सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड, राजेश राठोड, रमेश राठोड ,मंगल चव्हाण, , संतोष राठोड , विशाल राठोड, आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष भोलेनाथ कांबळे यांनी श्री राठोड यांच्या हा सन्मान त्यांच्या कार्याची पावती आहे असे उद्गार काढले व त्यांच्यासारखे आपण सर्व शिक्षकांनी सातत्य प्रयत्न करावे असे गौरवोद्गार काढले. त्याचप्रमाणे श्री.आडे यांनी गाव व शाळा जर एक झाल्या तर बदल निश्चित आहे आणि तेच करण्याचं काम श्री. राठोड यांनी केले असल्याचे सांगून त्यांच्या हातून सदैव सत्कर्म घडो असे गौरवोदगार काढले. श्री.राठोड यांनी वडसद तांडा येथे सलग सात वर्ष कर्तव्यावर असताना मुख्याध्यापक शशिकांत जामगडे यांच्या मार्गदर्शनात शाळेमध्ये विविध गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम राबविले त्यामध्ये व्हिलेज गोटू स्कूल, छतावरची शाळा, माता हेच गुरु, आदर्श परिपाठ ,आजचा माझा, स्वच्छ सुंदर विद्यार्थी, आदर्श विद्यार्थी, कृती युक्त पाढे, माझे हस्ताक्षर माझे भविष्य, बोलीभाषेकडून, मातृभाषेकडे , भव्य दिव्य सांस्कृतिक कार्यक्रम,अशी विविध उपक्रम राबवून शाळेतील मुलांचा गुणवत्ता विकास सातत्याने केला. त्याचप्रमाणे गावांमध्ये सुद्धा एकोपा निर्माण करून लोकसहभागातून विविध शाळेकरिता विविध भौतिक सुविधा मिळवून शाळा सुसज्ज केल्यामुळे गावातील सर्व नागरिक, पालक, नवतरुण वर्ग, शिक्षकांनी त्यांचा पूर्ण आहेर देऊन शाल ,श्रीफळ, सन्मानचिन्ह ,सन्मानपत्र देऊन “उत्कृष्ट शिक्षक सन्मान “म्हणून मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरस्वती भुरके यांनी केले तर आभार उज्वलराज सुनकुरवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व नागरिक, माजी विद्यार्थी, शिक्षक, नवयुवक मंडळ यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close