ईतर

पुसद येथे छत्रपती शिवराय जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव कार्यक्रमात लोकहित विद्यालयाचे यश!

पुसद : शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने येथील स्व.शेषराव पाटील जिंनीग प्रेसिंगच्या आवारात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये लोकहित विद्यालय व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पुसदच्या विद्यार्थ्यांनी दमदार प्रदर्शन करीत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे.

संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे यांच्या मार्गदर्शनात व प्राचार्य संजीवकुमार वाघमारे यांच्या नियोजनात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘शिवजन्म ते शिवराज्याभिषेक – स्वराज्याचा गौरवशाली प्रवास’ या थीमवर अतिशय उत्कृष्ट नृत्य सादर केले.शिवप्रेमी प्रेक्षकांची मने जिंकून सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सर्व तृतीय येण्याचा मान पटकाविला आहे. यामध्ये अभिनव धुळे,संस्कार बरडे, संघर्ष कांबळे, दिव्या पवार, लावण्या आरबेडवार, अलोक अंभोरे, सोहम कांबळे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या तर ओमकार बुरकुले, गणेश टिकले, विराज बावणे, आदर्श कांबळे, अनिकेत कोल्हे, सोहम भूजबूळे, रोहित कांबळे, अर्णव लोखंडे, दर्शन सुरजुसे, सुचिता जोगदंडे, परी मुंडे, पियू सोळंके, माही कांबळे यांनी मावळ्याच्या भूमिकेत काम केले.

सदर नृत्य मार्गदर्शक सोनाली गणेश गुल्हाने मोहन चौधरी अमोल भालेराव यांनी दिग्दर्शनाचे काम केले तर, महेंद्र आघाम, संदिप राठोड, मुंगशीराम कदम, अभिमन्यू शिंदे, सौरभ कुडे, नितेश आवारी, सचिन वरठी व इतर सर्व सहकारी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले सदर कार्यक्रमाकरिता प्राचार्य संजीवकुमार वाघमारे, नितीन कुमार धनरे, रुपेश आसेगावकर पांडुरंग बुरकुले व सर्व शिक्षक कर्मचारी वृंद यांनी अथक परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close