महिला उद्योजक प्रा.डॉ. अनुश्री.अ.पुरी (बन) यांना “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५” पुरस्कार जाहीर!

पुसद:येथील महिला उद्योजक प्रा.डॉ. अनुश्री.अ.पुरी (बन) यांना “महाराष्ट्र बिझनेस आयकॉन अवॉर्ड २०२५” पुरस्कार जाहीर झाला आहे.रिसील डॉट इन (शुअर मी मल्टीपर्पज प्रा.लि) व इंडिया फॅशन आयकॉन मॅगझिन तर्फे दि,२७ ते २९ जानेवारी २०२६ व २ ते ६ फेब्रुवारी २०२६ या दोन टप्प्यात नाशिक येथे हा सोहळा पार पडणार असून देशाच्या आघाडीच्या पुरस्कार सोहळा म्हणून ह्या सोहळ्याची नोंद झाली आहे. अशा या देखण्या सोहळ्याच्या मानकरी म्हणून ठरलेल्या श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाच्या प्रा.डॉ.अनुश्री अनिल पुरी (बन) समाजशास्त्र विभागाच्या प्र.विभाग प्रमुख तथा ऐश्वर्या ऍग्रो इंडस्ट्रीज पुसदच्या प्रोप्रायटर व तालुका महिला अध्यक्ष,लघु उद्योग भारती पुसद यांनी उद्योग क्षेत्रातील कठीण परिश्रमातून त्यांच्या आत्मविश्वासाने पुसद येथे ऐश्वर्या ॲग्रो इंडस्ट्रीज मार्फत स्वतःचा ऐश्वर्या कच्ची घाणी खाद्यतेलाचा व्यवसाय सुरू केला आहे.
तेव्हा महिला उद्योजक म्हणून अल्पावधीतच हा व्यवसाय त्यांनी पुसद शहरातील ग्राहकापासून सुरुवात करून आज रोजी हा व्यवसाय व ग्राहक अमरावती,नागपूर, आणि छत्रपती संभाजी नगर अशा अनेक तालुका जिल्हे व विभागाशी जोडण्यात यशस्वी झाल्या आहेत. हा व्यवसाय प्रत्येक कुटुंबाला १००% प्राकृतिक पद्धतीने तयार केलेले शुद्ध खाद्यतेल मिळावे व आरोग्याच्या समस्या कमी व्हाव्यात या मानवी दृष्टिकोनातून हा व्यवसाय सुरू केला असून महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा व तसेच महिला सक्षम व्हाव्यात व त्यासोबत व्यवसायाकडे त्यांचा कल निर्माण व्हावा,रोजगार निर्मिती व्हावी व महिला उद्योजक म्हणून स्वतःचा व्यवसाय उभारावा या हेतूने उभारला आहे.स्वतःची आवड आणि श्रमातून त्यांनी नोकरी व कुटुंबाची जबाबदारी पार पडत हा व्यवसाय उभारला आहे.हा व्यवसाय सुरू करण्यासाठी डॉ.अनुश्री पुरी (बन) यांनी जिल्हा उद्योग भवन यवतमाळ , पुणे आणि तसेच ऑनलाईन वर्कशॉप केले असून त्यांनी पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना औद्योगिक समाजशास्त्र विषयाचा एकूणच सात ते आठ वर्ष अध्यापन केल्याचा अनुभव असून त्या सोबतच बचत गटांच्या महिलांच्या अनेक समस्या सोडवण्यात यशस्वी झाल्या आहेत. विशेष म्हणजे त्या एक शेतकरी असून त्यांच्या स्वतःच्या शेतीत भुईमूग ( मुंगफली) पिक दरवर्षी घेतात त्यामुळे त्यांना बी बियाण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे त्यांनी या खाद्यतेलाच्या व्यवसायाची निवड केली आहे. महिला उद्योजक म्हणून त्यांनी अनेक महिलांच्या व्यवसायातील समस्या दूर केल्या असून उद्योग क्षेत्रात केलेल्या कामाची व त्यांच्या उभारलेले व्यवसायाची मेहनतीची यशस्वीता आणि कौशल्याची नवीन पिढीला व नव उद्योजकाना व्यवसाय अनुभवाचा भविष्यासाठी कामी यावा. यांच्या पासून प्रेरणा मिळावी म्हणून यांच्या कार्याची दखल घेत प्रा.डॉ.अनुश्री पुरी ( बन) यांची महाराष्ट्र बिझनेस आयकॉन २०२५ पुरस्कासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार डिझायनर, क्रिएटर आणि उदयोन्मुख तरुणांचा गौरव करण्यासाठी या सोहळ्याचे आयोजन केले जात आहे. या पुरस्कारासाठी प्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या मा.अभिनेत्री वर्षा ऊसगावकर ,सोनाली कुलकर्णी व प्रार्थना बेहरे यांच्या उपस्थितीत दि,३ फेब्रुवारी २०२६ रोजी हा सोहळा नाशिक येथे पार पडणार असून डॉ. बन यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.



