ईतर

महावीर नगर येथे नालीचे घाण पाणी प्लॉटमध्ये साचल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात नगर अभियंत्याच्या अजब गारभार!

पुसद नगर परिषदेच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ महावीर दलित वस्तीत उमरखेड मार्गा लगत असलेल्या जैन मंदिर ते चिलवाडी रोड पर्यंत असलेली नालीचे बांधकाम काही वर्षापूर्वी निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे या नालीची संपूर्ण तुटफूट झाल्यामुळे परिसरातील  नागरिकांच्या प्लॉटमध्ये घाणीचे पाणी पसरत आल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या महावीर नगर येथे काही वर्षांपूर्वी दलित वस्ती अंतर्गत सिमेंट रस्ते व नाल्याचे बांधकाम झाले होते परंतु संबंधित नगरपरिषद प्रशासनातील अभियंता कंत्राट दराने संगणमत करून निकृष्ट दर्जाचे कामे केली होती त्यामुळे या सिमेंट रस्त्याला खड्डे पडून सर्व रस्ते खराब झालेले आहे तसेच सर्व सांडपाण्याच्या नाल्या हे तुटपुट झाल्यामुळे सांडपाणी हे जाण्यासाठी उतार मार्ग नसल्यामुळे एकाच ठिकाणी थांबले आहे तसेच काही ठिकाणी नाल्यातील घाणपाणी खुल्या प्लॉटमध्ये जाऊन साचल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे व जंतूचा प्रदुभाव वाढल्यामुळे नागरिकासह लहान बाळाचे सुद्धा आरोग्य खराब होऊन साथीचे रोग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही असे परिसरातील नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

 

अत्यंत महत्त्वाचे उमरखेड रोडला लागून असलेल्या प्लॉट समोरील चिलवाडी रोड ते जैन मंदिर पर्यंत असलेले नाल्या ह्या सर्व तुटल्यामुळे या नालीतील सर्व पाणी खुल्या प्लॉटमध्ये साचल्यामुळे हे आजूबाजूच्या विंधन विहीर (बोर) मध्ये उतरत आहे त्यामुळे लोकांच्या वापर करण्यात येणाऱ्या पाण्यामध्ये गढूळ आणि अत्यंत खराब पाणी येत असल्यामुळे या पाण्याचा वास येत आहे त्यामुळे नागरिकाकडून वारंवार नगर प्रशासनाला तोंडी व सांगूनही आजपर्यंत कोणतेही नियोजन करण्यात आले नाही. तत्कालीन मुख्याधिकारी अभिषेक वायकोस यांना या संदर्भात नागरिकांनी भेटून बोलल्यामुळे त्यांनी संबंधित नगर अभियंता यांना कळविले होते परंतु आजपर्यंत कोणतीही उपयोजना झाली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

 

मताचा जोगवा मागणाऱ्या नगरसेवक यांनी सुद्धा आजपर्यंत कोणतेही लक्ष दिले नाही त्यामुळे आज रोजी नगरसेवकांकडे नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे नवनिर्वाचीत नगराध्यक्षा सौ मोहिनीताई नाईक यांनी या प्रभागातील विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालून हा विषय निकाली काढावे असे महावीर नगर मधील नागरिकांची मागणी आहे.

 

महावीर नगर  हे उमरखेड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्या लगत असलेली नाली असल्याने ही नाली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येते  त्यामुळे या नालीच्या दुरुस्तीच्या कामाची जबाबदारी नगर परिषदेची नाही.. – शुभम अचमारे नगर अभियंता नगरपरिषद पुसद, 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close