पुसद शहर पोलिस स्टेशन येथे महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापनदिनानिमीत्त आरोग्य वैद्यकीय तपासणी शिबीर संपन्न!

पुसद : येथील शहर पोलिस स्टेशनच्या आवारात महाराष्ट्र पोलीस दलाचे वर्धापन (पोलीस रेझींग डे) दिनानिमीत्त आज दि ६ जानेवारी२०२५ रोजी पुसद पोलीस उपविभागातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची व त्यांचे कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी (फुल बॉडी चेकअप) चे शिबीराचे आयोजन करण्यात आली
यावेळी पुसद पोलीस उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन, शाखा मधील कार्यरत पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी त्यांचे कुटुंबीयासह येवुन आरोग्य तपासणी केली. वैद्यकीय अधिकारी व त्यांचे चमुकडुन ब्लड शुगर, बि.पि., डोळ्यांच े तपासणी, लिपीड प्रोफाईल इ. महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या असुन पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे कुंटुंबिय असे एकुण ८५ ते ९० सदस्यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आरोग्य तपासणीचा लाभ घेतला.
सदर मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन मा. पोलीस अधीक्षक कुमार चिंता साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात साहेब व सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागी पोलीस अधिकारी हर्षवर्धन बि.जे. साहेब पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पो. स्टे. पुसद (शहरचे) ठाणेदार सेवानंद वानखडे, पोलीस निरीक्षक तसेच पो. स्टे. वसंनगर चे ठाणेदार सतिष जाधव, पो. स्टे. पुसद ग्रामीण चे ठाणेदार सुरेंद्र राऊत, खंडाळा पो. स्टे. चे ठाणेदार स.पो.नि. विनीत घागे, वाहतुक नियंत्रण शाखेचे प्रभारी स.पो.नि. चौधरी यांनी शिबीरामध्ये त्यांचे अधिनस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना त्यांचे कुटुंबासह मोफत आरोग्य तपासणी करुन घेण्याबाबत आवाहन करुन व नियोजन करुन यशस्विरीत्या पार पाडला.



