Uncategorizedईतर

प्रतिभावान अभिनेते नाना पाटेकर यांचा ७५ वा वाढदिवसानिमित्त पुसद शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्ष लागवड करून वाढदिवस साजरा!

पुसद : नाम फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष समाजभान असलेले बॉलिवूडचे लोकप्रिय प्रतिभावान ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या ७५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि२ जानेवारी २०२६ रोजी ‘नाम’ फाउंडेशन पुसदच्या वतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर वृक्ष लागवड करून श्री स्वामी समर्थ केंद्र, सप्तगिरी नगर पुसद येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

    या शिबिरामध्ये सीबीसी, थायरॉईड,कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड, एस बी ए वन सी, लिपिड प्रोफाइल, हिमोग्लोबिन,प्लेटलेट,सिकलसेल यांची तपासणी करण्यात आली.

      कार्यक्रमाची सुरुवात केक कापून आणि त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबिर मध्ये २३५ जणांनी आपली तपासणी करून या उपक्रमाचा लाभ घेतला.

    या शिबिरामध्ये वाढदिवसानिमित्य नाम फाउंडेशन पुसद तर्फे १५ खुर्च्या श्री स्वामी समर्थ केंद्राला भेट देण्यात आल्या.

     या उत्कृष्ट कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून नाम फाउंडेशन यांचे आभार मानले…

     कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी नाम फाऊंडेशन पुसद व सप्तगिरी नगर मधील नागरिकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद रायपूरकर यांनी तर आभार स्वप्नील देशमुख यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close