क्राइम

हृदयद्रावक! वडिलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने मुलाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या! परिसरात हळहळ!

पुसद : शहरातील ईटावा वार्डात मन हेलावणारी घटना घडली आहे. वडीलांच्या मृत्यूचा विरह मुलाला सहन न झाल्याने या मुलाने टोकाचं पाऊल उचललं आणि जवळच असलेल्या एका विहिरीत मृत्यू अवस्थेत मृतदेह शुक्रवारी (दि. ३ जानेवारी २०२६) पहाटे ७:००च्या सुमारास आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. एका दिवसापूर्वीच वडिलांचा आजाराने मृत्यू झाला होता त्याचाच विरह सहन न झाल्याने या मुलाने टोकाचं पाऊल उचललं आणि आत्महत्या केली असल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.योगेश जामुंतराव ढाले (वय २१, रा. विटावा वार्ड) असे मृतकांचे नाव आहे. याबाबत’ झेप न्यूज’ मिळालेल्या माहितीनुसार, पुसदशहरातील ईटावा वार्डातील रहीवासी असलेले जामुनराव ढाले यांचे दीर्घ आजाराने गुरुवारी (दि. २ जानेवारी) निधन झाले असता एकीकडे वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी विधीची कार्य सुरू असताना वडीलांच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने निधनानंतर योगेश घरातून अचानक कुठेतरी निघून गेला होता त्यावेळी सायंकाळच्या ९ वाजेपर्यंत कुटुंबीय शेजारील नागरिकांनी त्याचा शोध घेतला; मात्र तो आढळून आला नाही. दुसरीकडे अंत्यविधीस विलंब होत असल्याने रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास त्याच्या वडीलावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतरही वार्डातील नागरिकांनी योगेशचा शोध सुरूच ठेवला. अखेर शुक्रवारी पहाटे रामायण नगरी परिसरातील एका विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला.वडिलांच्या निधनानंतर अवघ्या काही तासांत मुलाचाही मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. योगेशच्या पश्चात आई आणि एक भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अधिकचा तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close