लोकनेते सहकार महर्षी स्व. बाळासाहेब हे अजातशत्रू व्यक्तिमत्वाचे धनी!-राज्यमंत्री ॲड.इंद्रनिल नाईक ; मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन!

पुसद : सहकार, राजकारण व सामाजिक समस्यांची कशी हाताळणी करावी व कुणालाही आपलेसे कसे करावे याचे धडे बाळासाहेब देशमुख सवनेकर हे द्यायचे त्यामुळे ते अजात शत्रूमत्वाचे धनी होते असे प्रतिपादन राज्यमंत्री ॲड.इंद्रनिल नाईक यांनी व्यक्त केले.ते लोकनेते सहकार महर्षी बाळासाहेब देशमुख सवनेकर यांच्या ३१ व्या स्मृतिदिनानिमित्त येथील नवचंडिका सभागृहात सोमवारी(ता.३०) आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरीक वसंतराव पाटील कान्हेकर हे होते.प्रमुख अतिथी म्हणून यवतमाळ जि.प.चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील कामारकर,माजी शिक्षण सभापती बी.जी.राठोड,माजी सदस्य शिवाजी देशमुख सवनेकर,दिलीप पारध,भोलेनाथ कांबळे,पुसद पं.स.चे माजी उप सभापती विजय जाधव,दिलीप राठोड,माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर,राजेश आसेगांवकर,नाना बेले,दिलीप पाटील कान्हेकर,संवेदना सोशल फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर आदी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख सवनेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.पाटील यांनी सवनेकरांनी नाईक परिवाराच्या हातात हात घालून सहकार क्षेत्राला संजिवनी देऊन शेतकरी,ऊसतोड कामगार,शेतमजूर,वाहनधारक यांच्या हिताचे कार्य केले तसेच समाजिक व शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य केल्याचे सांगून त्यांना अभिवादन केले. संवेदना सोशल फाऊंडेनच्या विविध सामाजिक उपक्रमावर प्रकाश टाकून ना.नाईक याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित ‘तारे जमिन पर’ या उपक्रमास भरघोस आर्थिक मदत करणार असल्याचे अभिवचन सचिव शशिकांत जामगडे यांनी दिले. यावेळी बि.जी.राठोड यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.सूत्रसंचालन मुख्याध्यापक किरण देशमुख यांनी केले.आभार प्रदर्शन साहेबराव राठोड यांनी केले. कार्यक्रमाला साहेबराव ठेंगे,दिगंबर जगताप,सुधीर देशमुख,हर्षल देशमुख,राजाभाऊ देशमूख,संभाजी टेटर, यशवंत देशमूख,वसंत देशमूख,सूरेश कदम,वामनराव देशमूख,प्रभाकर टेटर,हेमंत मेश्राम,मंचक देशमूख,प्रा.हट्टेकर बालाजी काजळे,तूषार सेता,प्रतिक चव्हाण,पंडीत सूर्यवंशी,ॲड. गजानन देशमूख, काकडदातीचे उपसरपंच अरविंद पुलाते, संवेदना सोशल फाऊंडेशन, चिंतामणी सेवा मंडळ यांच्या पदाधिकार्यांसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.



