भीमा टायगर सेनेच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त पुसद येथे विविध कार्यक्रम;भीमअनुयानी शौर्य दिनानिमित्त महान योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोरदादा कांबळे यांनी केले!

पुसद :भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम टायगर वतीने गुरुवारी(१ जानेवारी) रोजी पुसद येथे विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती आज शासकीय विश्राम गृह पुसद येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भिम टायगर सेनेच्या पदाधिकारी च्या वतीने देण्यात आली.भीमा कोरेगाव शौर्य दिनानिमित्त भीम टायगर वतीने गुरुवारी(१ जानेवारी) रोजी सकाळी ११ वाजता तीन पुतळ्या जवळ बुद्ध वंदना घेऊन शूर वीरांना मानवंदना देेण्यासाठी पारंपारिक वाद्याच्या गजरात रॅली काढण्यात येईल या रॅली मध्ये पारंपारिक ढेमसा नृत्य बंजारा डफडा नृत्य महिला लेझीम पथक लाठी काठी इत्यादीच्या रॅली निघेल छत्रपती शिवाजी महाराज चौक सुभाष बाबू चौक ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचा समारोप होईल सायंकाळी ५ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात प्रबोधन गीत गायन सुरज आतिश भीम शाहीर टीव्.ही.स्टार नागपूर यांचा बुद्ध भीम गीतांचा बहारदार कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब शेळके,उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. राजेश वाढवे उपस्थित राहतील.स्वागताध्यक्ष प्रा.डॉ. सुनील खाडे आहे. भीमरावदादा कांबळे प्रा.डॉ. प्रशांत वासनिक, संघटनेचे विदर्भ अध्यक्ष विनोद फुलमाळी, डॉ.मोहम्मद नदीम विनोद शेङे शितलकुमार वानखडे एड. आरिफ अहमद भोलानाथ कांबळे डॉ.शिवाजी भुरके बुद्धरत्न भालेराव आनंद भगत प्रशांत धुळे विठ्ठल खडसे रवी ग्यानचंदानी. ऍड. विश्वास भवरे किशोर मुजमुले भारत कांबळे मारुती भस्मे गजानन जाधव करण ढेकळे पांडुरंग व्यवहारे अश्विनीताई पुनवटकर संजय राठोड विजय बहादुरे डॉ.शशिकांत इंगोले नारायण ठोके आशिषभाऊ काळबांडे जगदीश सावळे रावण शेङे मिलिंद हट्टेकर विजयभाऊ धुळे बाबाराव उबाळे करण भरणे देवेंद्र खडसे नागसेन मनवर अक्षय उईके सिद्धू दिवेकर अशोक चव्हाण प्रवीण राजहंस बाळासाहेब कांबळे गजानन हिंगमीरे दिलीप खैरे महेंद्र कांबळे दीपक परिहार अश्विन जयस्वाल मनोज कांबळे संदीप कावळे एडवोकेट रवी वाघमारे राजेश ढोले समाधान केवटे विनोद कांबळे.ल.पू.कांबळे सुखदेव भगत अर्जुन राठोड उपस्थित राहणार असून भीमअनुयानी शौर्य दिनानिमित्त महान योद्ध्यांना मानवंदना देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान भीम टायगर सेनेचे जिल्हाध्यक्ष किशोर कांबळे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केले आहे , यावेळी सल्लागार विष्णू सरकटे,जिल्हाध्यक्ष गीताताई कांबळे कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक जनार्धन गजभिये आर.पी. गवई आभार संतोष गायकवाड, प्रकाशक विष्णू सरकटे, रविकांत शिंगणकर अरुण बर्डे आदि भिम टायगर सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



