राजकिय

पुसद नगरपरिषद मध्ये स्वीकृत नगरसेवक पदांसाठी ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’ पाहणाऱ्याचे स्वप्न भंगणार!  स्वीकृत नगरसेवक निकषानुसार घ्या अन्यथा..

पुसद:नुकताच नगर परिषदेच्या निवडणूकीचा धुराळा थंडावला आहे.जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाची “ब” वर्ग असलेली नगरपरिषद आहे. नुकत्याच पार पडलेल्या या नगर परिषदेच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवक निवडून आणले. येथे राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली असून मागील निवडणुकीपेक्षा २ जागा वाढल्या आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीला १२ जागा मिळाल्या होत्या, तर यंदाच्या निवडणुकीत भाजपाचे ५ व शिवसेनेचे ४ जागांचे नुकसान झाले आहे. मागील निवडणुकीत भाजपला १९, तर शिवसेनेला ४ जागावर समाधान मानावे लागले आहे. परंतु यावेळी भारतीय जनता पक्षाला जबरदस्त धक्का बसला असून शिवसेना (उबाठा)व शिवसेना शिंदे गटाचा सुपडा साफ झाला आहे. काँग्रेसला अद्यापही बहुमताचा आकडा गाठता आला नसला तरी यंदा मात्र काँग्रेसच्या ३ जागा वाढल्या आहेत. प्रभाग क्र. १० मध्ये दोन, तर प्रभाग क्र. १३ अ मध्ये एक अशा तीन जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकल्या आहेत. बऱ्याच प्रभागात क्रॉस व्होटिंग झाल्याचे दिसून आले, तर नगराध्यक्ष पदाच्या स्पर्धेतील भाजपा, शिंदेसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आदी पक्षांच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांवर आत्मचिंतनाची वेळ आली आहे.नगराध्यक्ष पदाच्या चुरशीच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या अर्धांगिनी ॲड. मोहिनी नाईक यांनी बाजी मारली. त्यांनी प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या सहकारी घटक पक्षातील काँग्रेसचे उमेदवार डॉ. मोहम्मद नदीम यांचा अवघ्या ६६८ मतांनी पराभव केला. एकूण वैध ३९ हजार २२६ मतांपैकी मोहिनी नाईक यांना एकूण १३ हजार १९ मते मिळाली, तर डॉ. मोहम्मद नदीम यांना १२ हजार ३५१, तर भाजपाचे निखिल चिद्दरवार यांना तिसऱ्या क्रमांकाची ८५०४ मतांवर समाधान मानावे लागले. ३ मते अवैध ठरली असून २०६ मते “नोटा ला मिळाली, तर एक प्रदत्त मत आहे. मात्र, यंदाच्या निवडणुकीत सर्व सत्ता समीकरणे अनुकूल असतानाही राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या उमेदवार ॲड. मोहिनी इंद्रनील नाईक यांचा विजय अवघ्या ६६८ मतांवर येऊन ठेपला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत भरघोस यश मिळाले असले तरीही बहुमताचा आकडा पार करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.राष्ट्रवादी काँग्रेसकडे १४ नगरसेवक आहे. त्यात अध्यक्षाला मत देण्याचा अधिकार असल्यामुळे त्यांच्याकडे १५ नगरसेवक होवु शकतात. असे असले तरी स्पष्ट बहुमत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी एकतर ३ अपक्षाचा पाठिंबा घ्यावा लागेल. परंतु ५ वर्ष नगर परिषद कारभार पाहण्यासाठी अपक्षांचे लाड पुरवावे लागेल. महायुतीतील घटक पक्ष असलेला भाजपाकडे ५ नगरसेवक आहेत. त्यांचा पाठिंबा घेवून नगर पालिकेचा कारभार चालविण्यास राष्ट्रवादी काँग्रेसकडुन चाचपणी सुरु असल्याचे सूत्राची माहिती आहे.राज्यात माहायुतीचे सरकार असल्यामुळे तोच ‘फार्मूला’ पुसद नगर परिषद मध्ये राबबिला जाईल तर पुढील ५ वर्षाचा कारभा सुरळीत चालेल नाहीतर नगर अध्यक्षपद असून सुद्धा राष्ट्रवादीला मोठ्या अडचणीला समोर जावे लागेल. ९ नगर सेवकामागे १ स्विकृत सदस्य निवडुण येतो. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १४ नगरसेवक आहेत. त्यांचा दुसरा स्विकृत सदस्य निवडुण आणण्यासाठी १८ नगरसेवक असणे आवश्यक आहे. त्यांच्याकडे ती संख्या नाही. ३ अपक्षांना सोबत घेतले तरी १८ चा आकडा गाठु शकत नाही. नगराध्यक्षाला स्विकृत सदस्यांच्या निवडणुकीत मत देण्याचा अधिकार आहेत राज्य सरकारने स्वीकृत नगरसेवक निवडीचे अधिकार आता नगराध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे भाजपाचा पाठिंबा घेतला तर भाजपाचा एक स्विकृत सदस्य निवडुण येईल. उपाध्यक्ष पद व एक समिती युतीमध्ये भाजपाला देवुन भाजपाचा पाठिंबा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशिल असल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे राज्यात अर्थ खाते असले तरी मुख्यमंत्री हा भाजपाचा आहे. युती झाल्यानंतर भरघोष पुसद नगरपरिषद ला निधी मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे अनेकांना स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहेत. पण स्वीकृत नगरसेवक निवडताना निकषाचे पालन करणे आवश्यक आहे जर स्वीकृत नगरसेवक निवडताना निकषाचे पालन झाले नाही तर या विरोधात काही सामाजिक कार्यकर्ते न्यायलात दाद मागणार आहेत.पुसद नगरपरिषद मध्ये ३ जण स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढील पाच वर्ष काम करू शकतील. त्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या पक्षाच्या कोट्यातून कोण आला आहे, संबंधित निकषात बसतो का, हे स्पष्ट झाल्यानंतर नगराध्यक्ष स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करतील. अशी अपेक्षा आहे. परंतु सध्या ‘मुंगेरी लाल के हसीन सपने’पाहणारे किंवा ज्यांची पात्रता नसलेले सुद्धा इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले आहे तरीही स्वीकृत नगरसेवक पदांसाठी निवड करताना निकष पाळले जावेत अशी चर्चा जनमानसात सुरू आहे.आतापर्यंत राजकीय सोय म्हणून स्वीकृत नगरसेवकपद दिले जात होते; परंतु या वेळी शासनाने काही निकष दिल्याने माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष किंवा महापौरांना पुन्हा मागील मार्गाने नगरपरिषद सभागृहात जाता येणार नाही. तरीही शासनाच्या निकषात बसून असे करता येते का, याची चाचपणी सुरू असल्याचे समजते. 

 

“असे आहेत स्वीकृत नगरसेवक पदासाठी निकष”

मान्यता प्राप्त नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव, शिक्षणतज्ज्ञ म्हणून पाच वर्षांचा अनुभव. निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक {सनदी लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव) (पाच वर्षांचा अनुभव असलेला अभियांत्रिकी पदवीधारक) (पाच वर्षांचा अनुभव असलेला अभिवक्ता किंवा राज्यात वर्षे विधी क्षेत्राचा अनुभव असलेली व्यक्ती.) (नगर परिषदेचा मुख्याधिकारी किंवा पालिकेचा सहायक आयुक्त, उपायुक्त म्हणून पाच वर्षांचा अनुभव) (नोंदणीकृत अशासकीय समाजधिष्ठित संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा अनुभव.) हे निकष जर या पक्षाने पाळले नाही तर अनेक सामाजिक कार्यकर्ते न्यायला दाद मागणार आहेत अशी पुसद शहरात चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close