पुसद शहरात गॅस सिलिंडरचा तुटवडा; अन्नपुरवठा विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!
हॉटेल व्यावसायिकांना मात्र तत्काळ सिलेंडर मिळत असल्याचा ग्राहकांचा आरोप!

पुसद: शहरात मागील काही दिवसापासून घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सिलेंडरचा ही काळाबाजार वाढला आहे घरगुती गॅस सिलेंडरसाठी काळ्या बाजारात नागरिकांना अवाच्या -सव्वा दाम दुपटीने भाव देऊन गॅस सिलेंडर खरेदी करावे लागत असल्याने गृहिणीचा बजेट कोलमंडला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, बुकिंग केल्यानंतरही सिलिंडर वेळेत मिळत नसल्याने तसेच हॉटेल व्यवसायिकांना मात्र सिलेंडर वेळेवर दिले जात असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला असून अन्नपुरवठा विभागाचे यावर कोणतेही नियंत्रण नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत ‘झेप न्यूज ला’ सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, पुसद शहरात एच.पी. गॅस एजन्सी, इंडियन गॅस, भारत गॅस यां एंजंन्सीकडुन काही दिवसापासून गॅस सिलेंडर पुरविण्यासाठी असुविधा देत असल्याने ग्राहकांना अवैध सिलेंडर विक्री करणाऱ्यांकडून जादा दराने सिलेंडर घ्यावे लागत आहे. यामुळे ग्राहकांची आर्थिक गळचेपी होत आहे.घरगुती गॅस सिलेंडरची ऑनलाइन व प्रत्यक्ष नोंदणी केल्यास २ दिवसांत तो मिळण्याची सवय नागरिकांच्या अंगवळणी पडली होती. मात्र त्या सवयीनुसार सिलेंडरची नोंदणी केल्यावर २ दिवसांत सिलेंडर येत नसल्याने दोन दिवसाचे ५ दिवस झाले तरी सिलेंडर मिळत नसल्याने नागरिकाची एकच तारांबळ उडत आहे.जो तो सिलेंडरची गाडी कधी येते याची वाट पाहू लागला आहे.एचपी गॅस सिलेंडरचा पुरवठा गॅस वितरकांना होत नसल्याने गॅस सिलेंडर चा तुटवडा भासत जास्त भासत आहे.दोन ते तीन दिवसात सिलेंडर मिळतील कंपनी कडून सिलेंडर पुरवठा उशिराने होत असून आठवड्यातुन एकदाच कंपनी सिलेंडर पुरवठा करीत असल्याचे गॅस सिलेंडर बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना गॅस एजन्सी मध्ये काम करणारे कर्मचारी सांगत आहेत. मात्र हॉटेल व्यवसायिकांना काळा बाजारात गॅस सिलेंडर ताबडतोब उपलब्ध करून दिले जात आहे.घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरसाठी शासनाच्यावतीने सवलती दिल्या जातात. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी असतात. त्याचाच गैरफायदा हॉटेल व्यावसायिकांकडून घेतला जात आहे. पुरवठा विभागाने यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परंतु, कारवाई होत नसल्याने गॅस सिलेंडरचा काळाबाजार फोफावत असुन व्यावसायिक खुलेआम घरगुती गॅस सिलिंडरचा वापर करीत आहेत.शहरासह ग्रामीण भागात हॉटेल, चहा टपऱ्या, खानावळी आणि वाहनांतही घरगुती गॅस सिलिंडरचा खुलेआमपणे बिनधास्त वापर होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर गॅसचा असा वापर होत असल्याने अपघाताचा धोका वाढला असून, पुरवठा विभाग वा संबंधित यंत्रणा कारवाईकडे डोळेझाक करीत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.यामुळे शहरात गॅस सिलेंडरच्या काळ्या बाजारात दलाल सक्रिय झाले असून गॅस सिलेंडर साठी आवाचे -सव्वा रूपये नागरिकांना मोजावे लागत असल्यामुळे गृहिणीचा बजेट कोलमंडला आहे. मात्र अन्नपुरवठा विभागाचे एवढ्या ज्वलंत प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.



