ईतर

पुसद शहरातील मुख्य बाजारपेठेतील रहदारीच्या ठिकाणी अवैधरित्या फटाक्यांची विक्री जोरात: संबंधित विभागासह पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष!

पुसद : शहराच्या ह्रदयस्थानी असलेल्या मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौक परिसरात रहदारीच्या ठिकाणी अवैधरीत्या बिनापरवानगी साठा करून ज्वलनशिल असलेले फटाके विक्री मोठ्या जोमात सुरू आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.परंतु शहरातील या मुख्य चौकात काही व्यापाऱ्याने अवैधरित्या नागरिकांनी गजबजलेल्या गांधी चौकात रहदारीच्या ठिकाणावर फटाक्यांचे स्टॉल, दुकाने मांडून काही ठिकाणी नियमांना तिलांजली देत मिळत असताना या शहरात रहदारी असलेल्या महत्त्वाच्या रस्त्यांवर चौकांमध्ये फटाके विक्री करून नियमांचे उल्लंघन केल्याचे चित्र दिसत आहे. फटाक्यांची विक्री करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते. विनापरवाना फटाका विक्री केल्यास मोठा दंड ठोठावला जातो.तरी हे फटाके विक्रेते फटाक्याचे विक्री करीत आहेत मात्र याकडे संबंधित विभागासह पोलीस विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्यामुळे अशा अवैधरित्या थाटलेल्या फटाक्याच्या दुकानावर कारवाईची मागणी शहरातून जोर धरू लागली आहे.

याबाबत सूत्रांनी ‘झेप न्यूजला’ दिलेली माहिती अशी की, पुसद शहरामध्ये कायमस्वरूपी फटाका परवाना नसलेल्या काही फटाका व्यापाऱ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेतील महात्मा गांधी चौकात अतिशय गर्दीच्या ठिकाणीफटाक्याचे दुकाने थाटून फटाके विक्री व साठा करून ठेवला असल्याने भविष्यात या परिसरातील नागरिकांच्या व शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शहरातील मध्यभागी असलेल्या महात्मा गांधी चौकातील रहदारीच्या ठिकाणी हे फटाक्याचे दुकान अवैधरित्या सुरू असून शहरातील सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतीमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाका विक्री आणि साठवणूक करण्यास सक्त मनाई असतांना सुद्धा याठिकाणी फटाक्याच्या  साठा करून विक्री सुरू आहे.

मात्र हे दुकानदार कायद्याला धाब्यावर बसवत शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत नागरिकांचा जीव धोक्यात घालत आहे. फटाका दुकानाची नगरपालिकेच्या अग्निशामक व आणिबाणी विभागाकडून स्थळ पाहणी करणे गरजेच्या तसेच हे दुकाने असलेल्या इमारती ही मुख्य बाजारपेठेत असल्याने हा व्यापार बंद करावा यामुळे अपघाताचा धोका तर उद्भवतोच शिवाय कायद्याचे देखील मोठे उल्लंघन समजले जात आहे. दिवाळीत आतिषबाजीसाठी पोलिसांनी व संबंधित विभागाने नियमावली जाहीर केली असते. फटाक्याच्या दुकानासाठी दीपावलीच्या १५ दिवस अगोदर व १५ दिवस नंतर फटाके विक्री परवाना असल्याची माहिती आहे परंतु काही फटाका व्यापारी बाराही महिने फटाक्याची साठवणूक करून सार्वजनिक रहदारीच्या ठिकाणी खुल्लेआम फटाके विक्री करीत आहेत. दीपावलीमध्ये फटाके विक्री दुकानांना परवानगी देण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या भागात फटाका विक्री दुकाने थाटण्यात आली होती. शिवाय मानवी वस्तीजवळ कोणतेही फटाक्यांचे दुकान असता कामा नये तरीही मात्र शहरात सर्वत्र रहदारीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सर्रास फटाक्यांची विक्री केली जात आहे.पंरतु ज्या ठिकाणी फटाक्यांची विक्री केली जाते त्याठिकाणी अग्निशमन बंब ठेवणे, कायमस्वरूपी पाण्याचे टँकर अथवा बंब ठेवणे,वाळुच्या बकेट होऊन भरुन ठेवावे लागते परंतु या फटाके दुकानदाराने कोणतीही सुरक्षा न ठेवता केवळ सर्वसामान्य नागरिकांना धोका निर्माण होईल अशा रहदारीच्या ठिकाणी मुख्य बाजारपेठेत खुल्लेआम  फटाक्यांची दुकाने थाटून साठा करून अवैधरित्या विक्री सुरू केली आहे.अशा अवैध फटाक्याच्या दुकानावर बंधन ठेवण्याची ज्या विभागाची पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे.ते मात्र अर्थपूर्ण सबंधातून आशा अवैध विक्री फटाक्याच्या दुकानदारांना व फटाके विक्रीच्या व्यवसायाला प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे शहरातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी सुरू असलेले अवैध विक्री करणाऱ्या फटाच्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने जोडधळू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close