ईतर

पुसद येथील कै.शेषराव पाटील सहकारी जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्षांवर १३ संचालकांचा अविश्वास;सहकार क्षेत्रात खळबळ!

पुसद : शहरातील नेहमीच चर्चेत व वादाच्या भोवऱ्यात असलेल्या कै. शेषराव पाटील सहकारी जिनींग व प्रेसिंगचे अध्यक्ष विजयराव चव्हाण यांचेवर संस्थेच्या १३ समिती सदस्य संचालकांनी अविश्वास असल्याचे पत्र जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ यांना दिल्याने येथील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली. उपाध्यक्ष राजेश मल्हारी सोळंके यांच्यासह, संजय दत्तराव लोंढे, शरद शेषराव पाटील, प्रकाश रामराव वायकूळे, इकबाल अहेमद अहेमद खॉं मिर आलम खान, गुलाब जेसा राठोड, प्रकाश चर्तुभूज बोंबले, अवधूत भाऊराव पाटील, प्रतापराव अप्पाराव देशमुख, संतोष धोंडी अप्पा घळे,दिपक लक्ष्मन जाधव, श्रीमती विद्या पुरुषोत्तम डुबेवार,सौ.शांताबाई साहेबराव ठेंगे या संचालकांनी दिलेल्या पत्रात अध्यक्ष विजयराव भोपासिंग चव्हाण यांचे विरुध्द अविश्वास प्रस्तावावर चर्चा, विचार विनिमय करुन योग्य निर्णय घेण्या करीता संस्थेच्या संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविण्याची मागणी केली आहे. कोणत्याही विषयावर संचालक मंडळाला विश्वासात न घेता मनमानी करुन चुकीचे निर्णय घेतल्या जात असल्याने संचालकांना सभेत येण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे संस्थेच्या नुकसानीस कारण नसतांना संचालक जबाबदार ठरत आहेत. संस्थेचे दैनदिन कामकाज सुरळीत न चालविणे, संस्थेच्या पोटनियमा प्रमाणे प्रक्रीया उद्योग न करता संस्थेच्या हिताला हाणी पोहोचणे, त्यामुळे संस्थेचे आर्थिक व्यवहार विस्कळीत झाले. संस्थेत कापसाची खरेदी व प्रकीया उद्योग करण्याचे काम गेल्या अनेक वर्षा पासून बंद असूनही अध्यक्ष कोणतीही कारवाई करीत नाहीत. त्यामुळे संस्थेच्या अध्यक्षावर विश्वास राहीला नसून त्यांच्या विरुध्द हा अविश्वास प्रस्ताव नियमानुसार दाखल करीत असल्याचे पत्रात नमूद आहे. सहकारी कायद्याचे कलम ५७ अ अन्वये जिल्हा उपनिबंधक संस्थेचे नियंत्रीत अधिकारी असल्यामुळे संस्थेच्या विद्यमान अध्यक्षांचा अविश्वास ठराव त्वरित पारित करुन अध्यक्ष पदाची निवडणूक घेण्याची मागणी या पत्रातून करण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close