ईतर

पुसद पोलीसांत मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन गुन्हे तपसाकरीता दाखल!

पुसद : पोलीसांत गुन्हे अन्वेषणाची गती वाढवण्यासाठी आणि गुन्ह्याच्या ठिकाणीच तात्काळ वैज्ञानिक पुरावे गोळा करून त्यांचे विश्लेषण करण्याच्या उद्देशाने न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा, संचालनालय गृह विभाग, महाराष्ट्र राज्य यांचेकडुन उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पुसद कार्यक्षेत्र व उमरखेड उपविभाग यांचेकरीता मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही आज दि,८ डिसेंबर२०२५ रोजी उपलब्ध झाली आहे.पुसद व उमरखेड पोलीस उपविभागातील पोलीस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात या व्हॅनद्वारे विशेष तपास पथकाची नेमणूक करण्यात आली असून गुन्हे शोधात मोठी मदत होणार आहे.भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ नुसार ७ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षेच्या गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक पुरावे अति महत्वाची भूमिका बजावतात. यामुळे अशा गंभीर गुन्ह्यांचा तपास जलद गतीने आणि वैज्ञानिक पद्धतीने पूर्ण करण्यासाठी या व्हॅनचा उपयोग होणार आहे. या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनमध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, डिजिटल फॉरेन्सिक किट, पुरावे जतन व विश्लेषणासाठी विशेष साधने तसेच प्रशिक्षित पथकाची व्यवस्था करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या ठिकाणीच वैज्ञानिक तपासणी त्वरित सुरू करता येणे, पुरावे सुरक्षित ठेवणे आणि प्राथमिक निष्कर्ष मिळवणे यामुळे तपास प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनद्वारे फॉरेन्सिक तज्ञ हे गंभीर गुन्हयांच्या घटनास्थळावरील परिस्थितीजन्य पुरावे व ईतर भौतिक पुरावे गोळा करून गुन्हातील आरोपी निष्पन्न करण्याच्या उद्देशाने व गुन्हामध्ये दोष सिध्दी होण्याच्या दृष्टीने सहकार्य होणार आहे. सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही सतत २४ तास कार्यरत राहणार असुन त्याद्वारे उपविभाग पुसद व उमरखेड येथील गंभीर गुन्हे अनुषंगाने कामकाज करण्यात येणार आहे.सदर मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन ही कुमार चिंता, मा. पोलीस अधीक्षक, यवतमाळ, अशोक थोरात, मा. अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ यांचे मार्गदर्शनानुसार व हर्षवर्धन बी.जे. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग पुसद यांचे आदेशाने कामकाज करणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close