ईतर

काळी (दौ.) परिसरात बिबट्याचा धुमाकूळ;वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष!

जखमी बैलाला घेऊन नागरिकांची वनविभागाच्या कार्यालयावर धडक!

पुसद: मतदारसंघातील काळी दौ. परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. येथील घातला वनपरिक्षेत्रातील शेती शिवारात चरत असलेल्या बैलावर बिबट्याने झडप घालून बैलाला जखमी केले. ही घटना २ डिसेंबर२०२५ रोजी दुपारी ४:०० ते ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शेतीत काम करणाऱ्या शेतमालकांसह शेत मजुरांनी जोरात अर्डा ओरड केल्याने बिबट्याने पळ काढला त्यावेळी जखमी बैलाला घेऊन शेतमालकांसह ग्रामस्थांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या कार्यालयात आणून बांधले.त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी मात्र कार्यालयातून बेपत्ता असल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने गोरगरीब नागरिक, शेतकरी, शेतमजूर शेतामधील कामे करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नाहीत. बिबट्याच्या दहशतीमुळे परिसरातील शेतकर्‍यांची शेतीकामे ठप्प पडली आहेत. हे असे असतानाही वन परिक्षेत्र अधिकार्‍यांचे या गंभीर विषयाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी काळी (दौ.) हे वनपरिक्षेत्रामध्ये येणारे शेतकर्‍यांची ट्रॅक्टर अडवून त्यांच्याकडून अर्थपूर्ण बोलणी करण्यातच धन्यता मानीत असल्याचे बोलले जात आहे.यामुळे परिसरात बिबट्याच्या दहशतीपासून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य वनपरिक्षेत्र अधिकारी करत नसल्याची जनमानसात चर्चा आहे. बिबट्याने परिसरातील कित्येक पाळीव प्राण्यांवर हल्ले चढवीले असून अनेक जनावरांना जखमी केले आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर शेतीच्या कामाकरिता शेतात जाण्यास धजावत नसल्याची स्थिती परिसरामध्ये पहावयास मिळत आहे. वरिष्ठांनी वनपरिक्षेत्र अधिकारी काळी (दौ.) यांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देऊन त्याच्यावर कर्तव्यात कसूर करीत असल्याबाबत शिस्तभंग तथा दंडात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी काळी परिसरातील शेतकरी शेतमजूर नागरिकांच्या वतीने केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close