Uncategorized

श्री शिवाजी शिक्षण संकुलात दीपोत्सव २०२५ उत्साहात साजरा; २००० दिव्यांनी साकारली लक्ष्मीच्या पावलांची प्रतिकृती

पुसद : स्थानिक श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश स्कूल पुसद व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळीचा आनंद उत्सव घराघरात पोहोचवा व समाजातील प्रत्येक माणसांचे जीवन दिव्याच्या ज्योतीने उजळून निघावे या हेतूने अल्पसा प्रयत्न म्हणून १५ ऑक्टोंबर रोजी दीपोत्सव २०२५ हा अद्वितीय सोहळा श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या भव्य संकुलात अत्यंत उत्साहात संपन्न झाला. २००० दिव्यांनी साकारलेली लक्ष्मीची पाऊले ही प्रतिकृती पुसद करांचे मुख्य आकर्षण ठरली या कार्यक्रमाला

विशेष अतिथी म्हणून माजी आमदार ऍड निलय भाऊ नाईक यांचेसह निळकंठ पाटील, महेश भाऊ खडसे, डॉ. अमोल मालपणी ,श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध विजयराव पाटील चोंढीकर, सचिव अश्विनीताई अनिरुद्ध पाटील ,आशिष देशमुख उपस्थित होते.

सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते देवी सरस्वती, छत्रपती शिवाजी महाराज व देवराव पाटील चोंढीकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. सारंग कोरटकर, महेंद्र अंबुरे व विद्यार्थी संच यांच्या सरस्वती स्तवनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुष्परोप देऊन मान्यवरांच्या स्वागतानंतर गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रोमहर्षक पद्धतीने ढोल पथकाचे सादरीकरण केले त्यानंतर गुरुकुल इंग्लिश स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष्मी ,राम ,सीता, हनुमान ह्या वेशभूषा साकारून दीप नृत्य सादर केले.

त्यानंतर प्रमुख अतिथी ऍड. निलय भाऊ नाईक यांनी दीपोत्सव २०२५ मध्ये साकारलेल्या प्रतिकृती मधील मुख्य दिवा प्रज्वलित केला त्यांच्या समवेत क्रमाक्रमाने सर्व मान्यवर ,पालक, विद्यार्थी व शिक्षक यांनी प्रतिकृती मधील दिवे प्रज्वलित केले. याप्रसंगी लख्ख दिव्यांनी साकारलेली लक्ष्मीच्या पावलांची प्रतिकृती सर्वांचे आकर्षण ठरली या प्रतिकृती सोबत प्रत्येकाने छायाचित्रण करून आनंद व्यक्त केला. ही प्रतिकृती दीपक महल्ले व प्रसाद मुंडे यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आली. प्रमुख अतिथी ऍड. निलय भाऊ नाईक यांनी आपल्या भाषणातून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. आजच्या काळात प्रत्येक मुलींनी दिव्याची पणती बनवून आपल्या परिवाराला प्रकाशित करावे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या हस्ते जीवन ज्योती एड्स प्रतिबंध व प्रबोधन संस्था पुसद चे संचालक राहुल गायकवाड यांना संस्थेच्या वतीने भेटवस्तू देण्यात आली. त्यावेळी त्यांनी संस्थेचे आभार मानले. सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रमाचे मुख्य संयोजक प्रा. गजानन जाधव यांनी केले .सारंग कोरटकर आणि ३० विद्यार्थ्यांच्या संचाने बासरी वरील राष्ट्रगान करून कार्यक्रमाची सांगता झाली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य रामचंद्र हिरवे ,प्राचार्य अमित ठाकूर ,प्राचार्य डॉ लक्ष्मण वानखेडे, उपप्राचार्य दत्तात्रेय जीवने , व्ही ए राऊत ,पर्यवेक्षक सरोज गायकवाड, पर्यवेक्षक प्रज्ञा गडदे यासह गुरुकुल इंग्लिश स्कूल व श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close