कु.समीक्षा अग्रवाल राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम!

पुसद : येथील श्रीमती वत्सलाबाई नाईक महिला महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु.समीक्षा अखिलेश अग्रवाल हिला आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
श्री विनायक बहुउद्देशीय ग्रामीण विकास संस्था दिग्रस द्वारा संचालित शिवरामजी मोघे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पांढरकवडा यांच्यावतीने इतिहास विभाग तर्फे आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत येथील महिला महाविद्यालयाची एम. ए. (संस्कृत) द्वितीय वर्गाची विद्यार्थिनी समीक्षा अखिलेश अग्रवाल हिच्या निबंधाला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. निबंधाचा विषय होता महाराष्ट्रातील समाज सुधारक त्यामध्ये तिने राजश्री शाहू महाराज या विषयावर निबंध लिहिला होता. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी भोयर यांच्या हस्ते कु.समीक्षा अग्रवाल हिला रोख रक्कम व प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कुमारी समीक्षा अग्रवाल हिचे प्राचार्य अजय सोळंके, इतिहास विभाग प्रमुख डॉ. राहुल दखणे यासह महिला महाविद्यालयाच्या डॉ.वैशाली पांडे, डॉ.स्वप्ना देशमुख,डॉ.अंजली पांडे, डॉ.उज्वला तिखे यासह इतर प्राध्यापकांनी तिचे कौतुक केले. समीक्षा ही हिंदी वाचनालयाचे सचिव व पत्रकार अखिलेश अग्रवाल यांची सुकन्या आहे.



