पुसद येथे राजस्थान मंडळ कोजागिरी महोत्सव संपन्न!समाजातील गुणवंतांचा सत्कार!
म्युझिकल नाईट मनोरंजन कार्यक्रमाचे आयोजन

पुसद : राजस्थान मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव, विविध पदांवर नियुक्त समाजबांधवांचा सत्कार करण्यात आला. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी दिवंगत तुळशीरामजी वर्मा यांच्या स्मृतिमध्ये श्रध्दा ज्वेलर्स व व्यंकटेश ज्वेलर्स यांच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. मंचावर राजस्थान मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे, अग्रवाल मंडळ पुसद अग्रसेन जयंन्ती महोत्सव २०२५ चे अध्यक्ष गिरीष अग्रवाल ,राजस्थानी ब्राह्मण पंचायतचे अध्यक्ष नरेंद्र मानका, राजस्थानी महिला मंडळाच्या अध्यक्षा नंंदा तोष्णीवाल , आखिल भारतीय मारवाडी युवा मंच पुसद चे अध्यक्ष रवी (बंन्टी) काबरा विराजमान होते.
कोजागिरीत परभणी येथिल शुभाली कुचेरीयाँ यांच्या द्वारे म्युजिकल नाईट मनोरंजन कार्यक्रम प्रस्तुत करण्यात आले होते.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना व विविध संस्थेत प्रतिष्ठित पद व पुरस्कार प्राप्त करणाऱ्या राजस्थानी समाज बांधवांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष विजय भांगडे यांच्या हस्ते राधा कृष्णाची आरती करून प्रसाद व दुध वितरित करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन सौ.अपर्णा सोनी तथा कोमल भांगडे यांनी केले व कार्यक्रमाचे प्रस्तावना , आभार प्रदर्शन डॉ.सचिन कोठारी यांनी केले.
राजस्थान मंडळ च्या कोजागिरी महोत्सव यशस्वीते साठी राजस्थान मंडळ चे अध्यक्ष विजय भांगडे , सचिव डॉ.सचिन कोठारी , कार्याध्यक्ष गोंविद वर्मा , कोषाध्यक्ष गणेश अग्रवाल , उपाध्यक्ष संतोष दिक्षीत , सहसचिव विनोद मालु , सांस्कृतिक सचिव दिलीप इन्नाणी समेत समस्त राजस्थान मंडळ पुसद कार्यकारणी मंडळाने अथक परिश्रम व सहकार्य केले.
राजस्थान मंडळ कोजागिरी महोत्सव मध्ये राजस्थानी समाजातील समाजबांधव मोठ्या संख्येत उपस्थित होते. सदर माहीती राजस्थान मंडल चे प्रसिध्दी प्रमुख रुपेन्द्र अग्रवाल यांनी दिली.



