ईतर

खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत इसमाचा खुन; स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना केली अटक!

पुसद/ प्रतिनिधी. :  गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील माळपठरावरील खंडाळा पोलीस स्टेशन चे नाव नेहमीच चर्चेत असते. या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील अनेक गावामध्ये वरळी मटका,देशी दारू,गावठी दारू, तिन पत्ती जुगार अवैध धंदे बोकाळले असून गुन्हेगार बिनधास्त मोकाट फिरत आहे. कालच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आडगाव फाट्याजळील परीसरात एका इसमाचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळताच यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा करून तपासाची चक्रे फिरवली असता खंडाळा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने अवघ्या दोन तासांत खून करणाऱ्या दोन आरोपींना खंडाळ्याच्या डोंगरातून अटक केली आहे.यामुळे पोलिसांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे मात्र खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्यांना व वाढत्या गुन्हेगारीला आळा घालावा अशी मागणी माळ पठारावरील सर्वसामान्य जनतेच्या वतीने करण्यात येत आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की,खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे-आडगांव फाटा शिवारात दि,१५ सप्टेंबर २०२५ रोजी ११:०० वाजण्याच्या सुमारांस एका इसम नामे शेख इरफान ऊर्फ अप्पू शेख रहिमान रा. अमृतनगर खंडाळा यास खंडाळा येथील कांहींनी धारधार शस्त्राने वार करुन त्यास जिवेठार मारले असल्याबाबत फिर्यादी बेगम बी शेख इरफान ऊर्फ अप्पू वय ६० वर्ष, रा. अमृतनगर खंडाळा ता. पुसद जि. यवतमाळ यांनी खंडाळा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीवरून पोलिसांनी अप क्रमांक ३२५/२०२५ कलम१०३, १८९ (२), १९१ (२),१९१ (३), १९०,३५१ (२),३५१ (३) भान्यास अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य पाहून व सदर गुन्हयातील मारेकरी शोधण्याचे पोलीसांपुढे असलेले कठीण अवाहन पाहता पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पोलीस निरीक्षक श्री सतीष चवरे यांना गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणे कामी आदेशीत केले होते. त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद या पथकांस सदरच्या गुन्हयातील आरोपीचा शोध घेवून त्यांना तात्काळ अटक करण्याबाबत आदेशित करुन सुचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ कॅम्प पुसद पथकांने तात्काळ सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवून घटनास्थळाचे निरीक्षण करुन सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु करुन गुप्त बातमीदारा कडून माहीती प्राप्त केली असता सदर गुन्हयातील आरोपी १) शेख बरकत शेख मुसा २) शेख सबर शेख कुरबान हे खंडाळा घाटातील जंगल भागात असून ते पळून जाण्याचे तयारीत आहे अशी माहीती प्राप्त झाल्याने त्यावर सदर पथकांने अभ्यास करुन पोलीस कौशल्याचा वापर करुन सदर गुन्हयातील आरोपी शोध कामी खंडाळा जंगाल भागात रवाना होवून त्यांचा पाठलाग करुन कौशल्यपुर्वक व अतिशय शिताफीने ताब्यात घेवून पोलीस कौशल्याचा वापर करुन त्यांच्याकडे विचारपूस करता यांतील मयत इसम हा गेले महीन्यापासून शिवीगाळी दमदाटी करुन जिवाने मारण्याची धमकी देत असल्याने तसेच आज रोजी सकाळी काहीएक कारण नसतांना आम्हाला तसेच महीलांना शिवीगाळी करुन तो खंडाळा फाटा येथून वाशिम बाजूकडे जात असतांना त्याला थांबवून नेहमी शिवीगाळी का करतो असे विचारले असता आरोपी यांस मारण्याची धमकी दिल्याने त्याचा मनात राग धरुन यांतील आरोपी यांनी त्याचेकडील चाकूने त्याचेवर वार करुन जिवेठार मारले असल्याचे कबूली केले. आरोपी नामे-१)शेख बरकत शेख मुसा वय ३६ वर्ष, २) शेख सबदुर शेख कुरबान वय २२ वर्ष, दोन्ही रा. अमृतनगर खंडाळा यास ताब्यात घेवून पुढील कारवाई करीता पोलीस स्टेशन खंडाळा यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा. अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ अशोक थोरात (म.पो. से) सा तसेच मा. सहा. पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बी. जे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांची मार्गदर्शनात स.पो.नि. धिरज बांडे, पोउपनि शरद लोहकरे, सफो मुन्ना आडे, पोहवा तेजाब रणखांब, पोहवा सुभाष जाधव, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा रमेश राठोड, पोशि सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, पोशि राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close