ईतर

पुसद येथील मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाची हेळसांड;राष्ट्रवादीचे नेते शरद मैंद यांनी तात्काळ दखल घेऊन रुग्णांची केली विचारपूस!

पुसद : येथील नामांकित मेडिकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दि ५ सप्टेंबर रोजी महागाव तालुक्यातील काळी दौ येथील उमेश भालेराव या युवकांच्या दोन्ही किडन्या ह्या निकामी झाल्या असल्याने त्याला उपचारासाठी भरती करण्यात आले होते. तो गरीब असल्याने त्याला गावातील लोकांनी उपचारासाठी लोकवर्गणी करून मदतीचा हात दिला. त्या रुग्णाची या हॉस्पिटल मध्ये हेळसांड झाल्याने रुग्नच्या भावाने तक्रार दाखल केली होती. 
याबाबत प्राप्त माहिती अशी की, महागाव तालुक्यातील काळी दौ येथील किडनी आजाराने त्रस्त रुग्णाला पुसद येथील मेडिकेअर मल्टी स्पशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र या रुग्णांची परीस्थिती हलाखीची असल्याने उमेश भालेराव यांना मदतीसाठी  सोशल मीडियाच्या माध्यमातून हंसराज मोरे व गावकऱ्यांनी आवाहन केले असता त्यावेळी काही व्यापारी व गावकऱ्याने तात्काळ भरभरुन मदत दिली होती त्यावेळी सोशल मीडियावरील असलेली ही पोस्ट पाहून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते शरदभाऊ मैंद हे तात्काळ रुग्णाला भेटण्यासाठी मेडिकेअर मल्टीसशालिटी हॉस्पिटल येथे गेले त्यावेळी त्या रुग्णांवर  महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे व्यवस्थापक डॉ सतीश चिद्दरवार यांनी दिली त्यापूर्वीचे उपचाराचे पैसेही पेड करण्यात आले व डायलिसिसचा उपचार हा या योजनेतून करण्यात येईल असे हॉस्पिटलने सांगितलं मात्र हॉस्पिटलने चुकीचे पॅकेज टाकल्याने सदर पॅकेज रद्द झाले. हे तीन दिवसाने हॉस्पिटलच्या वतीने त्यांच्या नातेवाईकांना माहिती दिली व ४२८५०/-रुपयाचे बिल काढले. यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी याबाबत शरद मैंद यांना फोन करून होत असलेल्या आर्थिक पिळवणूकींबाबत व्यथा सांगितली असता त्यांसंबंधाने सहाय्यक जिल्हा समन्वयक महात्मा फुले जन आरोग्य योजना यांना बोलून हॉस्पिटलच्या चुकीच्या निर्णयामुळे हा भुर्दंड हा रुग्णांवर व्हायला नको. म्हणून फोन केला व उपचाराचा खर्च या गरीब कुटुंबाने आता कसा द्यायचा? रुग्णांवर  होत असलेला आर्थिक अन्यायाबाबत फोनवर बोलून हॉस्पिटलची चूक लक्षात आणून दिली असता,त्यांनी यावर कारवाईचे आश्वासन दिले व हॉस्पिटलशी बोलून ४२८५०/-  रुपये बिल या रुग्णाचे वाचले नातेवाईकांनी शरद मैंद यांचे आभार मानले व झालेल्या त्रासाची रीतसर तक्रार जिल्हा समन्वयक महात्मा ज्योतीराव फुले जनआरोग्य योजना,यवतमाळ यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यावर हॉस्पिटल वर उपचारादरम्यान आलेल्या अनुभवाला कथन करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली.अशाच प्रकारे या रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांची लुट होत असेल तर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने हॉस्पिटलच्या विरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शरद मैंद ह्यांनी रुग्णालयात येऊन रुग्णाला सहकार्य केले नसते तर आमच्याकडून हॉस्पिटलने त्याची चूक आमच्या माथ्यावर टाकून आम्हा गरीब कुटुंबाकडून नाहक बिल वसुल करून आर्थिक शोषण केले असते. शरद मैंद यांच्या मदतीमुळे एक रुपयांही भरायची वेळ आली नाही. सोबतच सर्व गावकऱ्यांनी व व्यापाऱ्यांनी उपचारासाठी केलेली मदत ही कौतुकास्पद आहे.
-गणेश भालेराव  रुग्णांचा भाऊ

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close