ईतर

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शहरातील तात्पुरते अतिक्रमण काढल्याने फूटपाथने घेतला मोकळा श्वास!

 

पुसद : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अदी नेते आज हरितक्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या ४६ व्या स्मृतिदिनानिमित्त बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित कृषी गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमातसाठी पुसद दौऱ्यावर असल्याने फुना ते बाना महाविद्यालय परिसरातील फूटपाथवरील अतिक्रमणे नगरपालिकेने तात्पुरते हटविले आहे त्यामुळे शहरातील या हामरस्त्यावरील फूटपाथने मोकळा श्वास घेतला आहे.

या नगर पालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत असले तरीही हि नगरपालिकेची कारवाई म्हणजे पोळ्याच्या सणासारखी आसल्याची चर्चा शहरातील परीसरात सुरू आहे.पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ राहणार आहे.

फुलसिंग नाईक बाबासाहेब नाईक महाविद्यालया प्रर्यत अनेक चौकापर्यंत मोकळी जागा आहे. या परिसरात फिरायला येणारेही भरपूर आहेत. याच रस्त्यावरील फूटपाथवरच अनेक दिवसांपासून खाऊच्या गाड्यांनी अतिक्रमण केले होते‌. जवळपास या हाम रस्त्याच्या आजूबाजूला फळविक्रीच्या भाजीपाल्याच्या हातगाड्या पान टपऱ्या चहा कॅन्टीन हॉटेल असे शेकडो दुकाने लागत असल्याने फूटपाथवरून चालताना जेष्ठ नागरिक, महिला व शाळाकरी मुलांना अडचण होत होती. खाण्यासाठी येणारे रस्त्यावरच वाहने पार्किंग करत असल्याने वाहतुकीस अडथळा होत होता. या मार्गावरुन मुख्य बसस्थानकाकडे जाण्यासाठी बसही येतात. यात रस्त्यावर ट्रॅव्हल्स पॉईंट असल्यामुळे नागरिकांची वर्दळ असते त्यामध्ये अवैधरित्या प्रवासी वाहतूक करणारे काळी पिवळी ऑटो छोट्या ट्रॅव्हल्स ग्रामीण भागात जाणाऱ्या ऑटोमुळे हा रस्ता नेहमी गजबजलेला असतो त्यामध्ये या रस्त्यावर शासकीय कार्यालय असल्यामुळे दुचाकीस्वार नागरिक कर्मचाऱी आशा वाहनधारकांची मोठी वर्दळ असते. त्यामध्येच खाद्यपदार्थ गाडीवर येणारे ग्राहक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावरच पार्किंग करत असल्यामुळे वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागायची. या अतिक्रमणाबाबत वारंवार नागरिकांनी तक्रारी करुनही संबंधित नगरपरिषद प्रशासन दखल घेतली नव्हती.तर वाहतुकीच्या नियंत्रणाची जबाबदारी केवळ मोजक्या पोलिसांच्या खांद्यांवर आहे.शहराची लोकसंख्या व त्यात शहरालगतच्या गावांची लोकसंख्या शहरात दररोज येणार्‍या वाहनांची संख्या हजारो असून, त्यात ग्रामीणमधून येणार्‍या वाहनांची नेम्मी आहे. शहरामध्ये लहानमोठे रहदारीचे चार -पाच चौक आहेत.या सर्व वाहनांना केवळ दोन-चार पोलिस विविध चौकाचौकांतून नियंत्रित करतात तर शहरातील सिग्नल व्यवस्था संपूर्णपणे कोलमडली आहे. सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्याची जबाबदारी संबंधित प्रशासनाची आहे. त्यातच रस्त्यांवर अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या वाहनावर कारवाई करणे ऐवजी कींवा मुख्य चौकांत बेशिस्त वाहने हाकणार्‍यांवर कारवाई करण्यापेक्षा गल्लीबोळात नाकेबंदी करीत वाहतूक पोलीसचा दंड वसुलीवरच भर दिला जात आहे. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा व अतिक्रमणाचा प्रश्न भीषण होत चालला आहे. मात्र मुख्यमंत्र्यासह अन्य मंत्री पुसद दौऱ्यावर असल्याने सुरक्षेच्या कारणाने होईना या अतिक्रमण काढल्याने शहरातील हामरस्त्यावरील फूटपाथने आज मोकळा श्वास घेतला आहे. त्यामुळे शहराच्या परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. पुन्हा परिस्थिती ‘जैसे थे’ होणार असल्याने हे मताचे राजकारण असल्याची चर्चा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close