Uncategorizedईतर

मुंगशी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी! वनविभागाकडे तक्रार दाखल!

पुसद : तालुक्यातील मुंगशी येथे ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेवरील वृक्षांची अवैधरित्या कत्तल केल्याची घटना उघडकीसआली आहे.त्या गावातील पृथ्वीराज नामदेव चव्हाण वृक्ष प्रेमींने पुसद  वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार दाखल केली असून विना परवाना व अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याबाबत प्राप्त माहिती अशी की, मुंगशी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गावठाण जमिनीवरील वृक्षांची मोठ्या प्रमाणात विनापरवाना व अवैधरित्या कत्तल केली तसेेेच परीसरात अनेक ठिकाणी याच प्रकारे वृक्षतोड केली गेली आहे.प्रामुख्याने उत्तम दर्जाच्या वृक्षांची कत्तल केली जात आहे.त्यात निंब व बाभूळ इतर प्रकारची आड जातीच्या वृक्ष तोडली जात आहे.काही दिवसांपासून या भागात वृक्षतोड करणाऱे टोळी सक्रिय झाली आहे.एखाद्या रोपट्याचे वृक्षात रूपांतर होण्यासाठी साधारणपणे दहा ते पंधरा वर्षे लागतात.परंतु एका दिवसात दिवसा ढवळ्या या वृक्षाची कत्तल केली जात असल्याने या अवैधरीत्या वृक्षतोड करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करावी अशी तक्रार पृथ्वीराज नामदेव चव्हाण वृक्षप्रेमीने वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे.ज्यांच्यावर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आहे, ती स्थानिक स्वराज्य संस्था मात्र या वृक्षातोडीकडे धृतराष्ट्राचे सोंग घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close