काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोविंद नगर येथे चालु असलेल्या ‘निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी करा’

पुसद : शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोविंद नगर कॉलनी, मध्ये चालू असलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची चौकशी व्हावी, याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुसद शहराला लागून असलेल्या काकडदाती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील गोविंद नगर कॉलनी मध्ये चालू असलेले रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून व शासनाने दिलेल्या नियम व अटींचे उल्लंघन करीत थातूरमातूर सुरू असल्याचे दिसून येत आहे. या कामामध्ये अनेक त्रुटी आहेत. सदर रस्त्याचे काम मंजुरात कामाच्या अंदाजपत्रकानुसार करण्यात येत नाही. या कामात त मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्या जात आहे. अधिकारी व ठेकेदार यांची मिली भगत असून हे काम अतिशय दर्जाहीन केले जात आहे त्यामुळे या कामाकडे तात्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अभियंताने लक्ष घालून संबंधित ठेकेदार व अभियंता,अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.यामध्ये प्रामुख्याने रस्ता रुंदीकरण करत असताना कठीण मुरूमा ऐवजी माती मिश्रित मुरूम वापरण्यात आलेली आहे. जेएसबीची (खडीकरण) जाडी कमी थातूरमातूर केले जात आहे या कामाच्या जागेवर कुठेही कामाच्या माहितीचा फलक लावलेला नाही. हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे थातूरमातूर रस्त्याचे काम करण्यात येत आहे. या रस्त्याचे सात मीटर रुंदीकरण इस्टिमेटप्रमाणे करणे बंधनकारक असताना कुठे सात तर कोठे पाच मीटर करण्यात येत आहे. या कामाची तातडीने शासनाच्या गुणवत्ता गुण नियंत्रण विभागामार्फत गुणवत्ता तपासावी तसेच सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी परंतु बोगस काम करणार्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याचा अल्टिमेटम देण्या ऐवजी संबंधित प्रशासनाकडून असे बोगस रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनाच पाठबळ दिले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे वरील सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून वरिष्ठ कार्यकारी अभियंत्यांनी सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, व त्याला पाठीशी घालणाऱ्या अभियंता अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीतून करण्यात आली आहे करण्यात आली आहे.



