ईतर

जल जीवन मिशनच्या ‘हर घर जल’ योजनेला घरघर; लोकप्रतिनिधीना मात्र जनतेचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र 

९०% पेक्षा अधिक कामे अर्धवट..

पुसद:ग्रामीण भागात प्रत्येकाच्या घरात पिण्याच्या पाण्याचे थेट नळकनेक्शन व्हावे म्हणून केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेला तालुक्यात घरघर लागली आहे परंतु जनतेने जनतेने निवडून दिलेले सरपंच आमदार या लोकप्रतिनिधीना मात्र जनतेचे सोयरसुतक नसल्याचे विदारक चित्र आहे.यवतमाळ जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागांतर्गत जलजीवन मिशनच्या ‘हरघर जल’ योजनेला गेल्या  दोन-तीन वर्षापासून  ‘घरघर’ लागली आहे. केवळ पुसद तालुकाच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातच ९० टक्केपेक्षा अधिक कामे अर्धवट स्थितीत असल्याचे चित्र आहे. याकडे संबधीत विभागांचे मात्र जाणीवपूर्वक  दुर्लक्ष सुरू आहे. कंत्राटदार आणि अभियंता व अधिकाऱ्यांचे संगणमत असल्यामुळे संपूर्ण निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून काम केल्याने या योजनेच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.केंद्र सरकारने ‘हर घर नल’ योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातील प्रत्येक घरात शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी सरकार प्रत्येक घरात नळ कनेक्शन देणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरात शुद्ध पाणी पोहोचवण्याचे २०२४ चे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण या योजनेतून ग्रामीण भागातील प्रत्येक घराला शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. तालुक्यात १०० पेक्षा अधिक गावांमध्ये या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली असून मात्र वर्ष दोन वर्ष उलटूनही जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाने केवळ पुसद तालुक्यातीलच नव्हेतर संपूर्ण जिल्ह्यातीलच बहुतांश कामाकडे कानाडोळा केल्याची ओरड आहे. जलजीवन मिशनची कामे ‘एक ना धड भराभर चिंध्या’ अशी स्थिती आहे. यामुळे ९० टक्के पेक्षा अधिक कामे अर्धवट स्थितीत आहे. तर या कामाला टक्केवारीचे ग्रहण लागल्याची चर्चा सुरू आहे.जलजीवन मिशनच्या कामात दुर्लक्षपणा होत असल्याने काही ठिकाणी वापरण्यात येणारी पाईप हलक्या दर्जाचे असून पाण्याची टाकी बांधकामातही निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून या बांधकामाची गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र गावातील किंवा स्थानिक कोणत्याही लोकप्रतिनिधीना मात्र जनतेचे सोयरसुतक नसल्याने हे विदारक चित्र आहे. तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामा बाबत येथील लोकप्रतिनिधी सुद्धा आढावा घेत नसल्यामुळे संबंधित कंत्राटदार अभियंता अधिकाऱी यांची मनमानी सुरू आहे जर एखाद्या नागरिकांनी या कंत्राटदारांना प्रश्न विचारला तर आम्ही टक्केवारी घेऊन कामे घेतली असल्याने आमचे कोणीही वाकडे करू शकत नाही असे जल जीवन मिशनचे काम करणारे कंत्राटदार मोठ्या तोऱ्यात वावरत आहेत. जर संबंधित विभागाचे मंत्री तशीच मुख्यमंत्री यांनी पुसद तालुक्यातील जलजीवन मिशनची – कामाची मोका पाहणी करून सखोल चौकशी केली तर संबंधित कंत्राटदार व जिल्हा परिषद पाणीपुरवठा अभियंता व अधिकारी यांचे बेजबाबदार निकृष्ट दर्जाचे कामांचे पितळ उघडे पडेल आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा जल जीवन मिशनच्या कामाची सखोल चौकशी केल्यास जलजीवन मिशनच्या भ्रष्ट कामाची पोलखोल होवू शकते त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close