भीम टायगर सेनेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त मान्यवर पत्रकार बांधवांचा सत्कार!

पुसद: येथील शासकीय विश्रामगृह येथे दि. ६ जानेवारी २०२५ रोजी भीम टायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने विविध पत्रकार बांधवांचा सत्कार करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
६ जानेवारी अचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी प्रथम दर्पण वृत्तपत्र सुरू केले त्याचाच वर्धापन दिन म्हणून पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच अनुषंगाने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भिम टायगर सेना पुसद तालुका च्या वतीने किशोर दादा कांबळे यांच्या मुख्य नेतृत्वात शासकीय विश्रामगृह पुसद येथे दैनिक वर्तमानपत्राचे पत्रकार प्रतिनिधी तथा इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांचा विविध भेटवस्तू देऊन सामाजिक ऋण सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद पंचायत समिती चे गटविकास अधिकारी संजय राठोड प्रमुख अतिथी शहर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक केदार साहेब, वसंत नगर पोलीस स्टेशनचे वेरूळकर, साहेब मिलिंद हट्टेकर, नागेश कॅम्पुटर चे संचालक ज्येष्ठ पत्रकार रवी देशपांडे शकील पठाण अर्जुन भगत प्रज्ञापर्व समिती अध्यक्ष, बाळासाहेब कांबळे गीता कांबळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष इत्यादी सहित प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती होती,या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता जनार्दन झोडगे दीपक गायकवाड प्रभाकर खंदारे राजू पठाडे प्रीतम आळणे मधुकर ठोके दत्ता कांबळे संजय शेळके विशाल डाके सतीश जाधव व भीम टायगर सेनेचे सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतलेया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गायकवाड यांनी केले तरया कार्यक्रमाचे प्रास्ताविक विष्णू सरकटे यांनी मांडले, पत्रकार बंधू उपस्थित होते. आभार प्रदर्शन गीता कांबळे यांनी मानले



