ईतर

लोकनेते देवराव पाटील चोंढीकर स्मृती समारोह; अनेक मान्यवरांनी वाहीली आदरांजली!

पुसद:स्थानिक श्री. शिवाजी शिक्षण संकुलाचे आधारवड, यवतमाळ जिल्हा परिषदेचे प्रथम अध्यक्ष, माजी आमदार तथा श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे संस्थापक अध्यक्ष दिवंगत लोकनेते देवराव पाटील चोंढीकर यांचा ३८ वा स्मृतीदिन समारोह श्री. शिवाजी शिक्षण संकुलाच्या भव्य प्रांगणात मान्यवरांच्या हस्ते पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

याप्रसंगी सर्वप्रथम माजी मंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी आमदार विजयराव पाटील चोंढीकर, दिलीपराव एडतकर, दिपकभाऊ आसेगावकर, प्राचार्य डाॅ. उत्तमराव रूद्रवार, शिवाजीराव देशमुख सवनेकर, अविनाश देशमुख, निळकंठ पाटील, सुधाकर ठाकरे, राम देवसरकर, दिगांबरराव जगताप, सिराज हिराणी, विजय जाधव, अनिरुद्ध पाटील चोंढीकर, डाॅ. शैलेन्द्र नवथळे, डाॅ. स्वप्निल देशमुख यांनी पूजन व दिपप्रज्वलन करून आदरांजली अर्पण केली.

यांच्या समवेत ॲड. रमेश पाटील, प्रा. गोविंदराव फुके, सुभाषराव पाटील चौधरी, काशीराव पाटील कृष्णापूरकर, अश्विनीताई अनिरुद्ध पाटील चोंढीकर, सुनिता ठाकरे, प्रा. माया राऊत, विद्या पाटील, डाॅ. नाना फुके, योगाजी गवळी, वामनराव देशमुख, जनार्दन ढवळे, दिलीपराव पारध, बि.जी. राठोड, साहेबराव धबाले, सुभाषराव मुडाणकर, रंजीत आसोले, विवेक मस्के, आशिष देशमुख, अभय राठोड, नितीन पाटील, लक्ष्मण पाचकोरे, रमाकांत चौधरी, शिवशंकर चौधरी, विकास ठाकरे, ओम पाटील ठाकरे, रामराव ठाकरे, मदनराव जांगीड, प्राचार्य हेमंत महल्ले, नानाभाऊ ताटेवार, पंडितराव घाडगे, प्रदीप पाटील, अरविंद पाटील, ॲड. अंकुश पाटील, महेश चौधरी, सदाशिव चौधरी, ॲड. नितीन जाधव, गुलाबराव हाके, किरण देशमुख सवणेकर, प्रविण पाटील, सुरेशराव चौधरी, दिनेश हांडे, शिवाजीराव जाधव, तथा पत्रकार अनिल चेंडकाळे, दीपक महाडिक, रवी देशपांडे, कुलदीप सुरोशे, शंकर माहुरे, प्रकाश खिल्लारे यांनी आदरांजली अर्पण केली. यांसह श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या विविध शाखेतील माजी प्राचार्य तथा मुख्याध्यापक नामदेवराव फाटे, पलिकोंडावार, डी.पी. देशमुख, सुधाकर लकडे, आर. एफ. शेख, प्रताप सुर्यवंशी, पंचमसिह चव्हाण, पंजाबराव सुरोशे, पी.के.सावदे, प्रा.गणेशराव रावते, सुखदेवराव भगत, ल. पु. कांबळे, राजेंद्र रोकडे, सदाशिव पठाडे, ए.के. देशमुख, दिपक महल्ले, प्रा. विलासराव चव्हाण, विजय उंचेकर, एम. डी. वानखेडे, शा. बा. राऊत, एम. बी. कदम, राजेंद्र भागवत, वि.अ.राउत तसेच संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य रामचंद्र हिरवे, लक्ष्मण वानखेडे, पंडितराव मस्के, शेख बिजान, सुनील गोंडे, वसंतराव धनवे, पेंटेवाड, कैलास ठेंगे, सुरेश कदम, संजय निकम, सादुडे त्याचबरोबर श्री. शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, श्री शिवाजी अध्यापक विद्यालय, गुरुकुल इंग्लिश मेडियम स्कूल व संस्थेच्या सर्व शाखेचे प्राचार्य, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, रा.से.यो. व एन.सी.सी. चे विद्यार्थी तसेच पुष्पावंती परिसरातील देवराव पाटील चोंढीकर याच्यावर प्रेम करणारे असंख्य नागरिक यांनी आपली आदरांजली अर्पण केली.बहारदार संगीताच्या साथीने संगीत शिक्षक सारंग कोरटकर, नारायण हनवते व विद्यार्थिनी संच यांनी वैविध्यपूर्ण गितांमधून आदरांजली अर्पण केली. स्मृती समारोह कार्यक्रमाचे संचालन प्रा.गणेशराव रावते व प्रा.गजानन जाधव यांनी केले .

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close